

प्रतिनिधी: निवृत्ती पगार,कोळपेवाडी,अहिल्यानगर
कोळपेवाडी:शासकीय कार्यालयांत नागरिकांना फोटो किंवा व्हिडिओ करण्यास मनाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता लगाम बसणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक पाचपुते यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व विभागांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की शासकीय कार्यालयांत सर्वसाधारण फोटो-व्हिडिओ बंदी अस्तित्वात नाही. नागरिकांना त्यांच्या कामाची नोंद ठेवण्याचा आणि पुरावा गोळा करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

अनेक कार्यालयांत कर्मचारी नागरिकांना “चित्रीकरण नको” अशी मनाई करत असल्याच्या तक्रारीवर त्वरित कारवाई करत जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशाची प्रत सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि विभाग प्रमुखांना पाठवली आहे. कार्यालयीन कामकाजातील पारदर्शकता टिकवणे ही प्रत्येक विभागाची जबाबदारी असल्याचे आदेशात नमूद आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले की कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी नागरिकांना फोटो-व्हिडिओ करण्यास विनाकारण रोखल्यास त्याच्यावर शिस्तभंगात्मक कारवाई होऊ शकते. पारदर्शक शासनासाठी नागरिक सहकार्य करत असताना त्यांना अडवणे हा मूलभूत अधिकारांचा भंग असल्याचेही प्रशासनाने सांगितले.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुकही होत आहे.

कोळपेवाडी
अस्तगाव येथे 7.50 लक्ष रुपये जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या माध्यमातून खर्च करून व्यायाम शाळा….
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





