प्रतिनिधी :रमेश नळे,राहता

प्रतिनिधी:- महाराष्ट्राने मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलव्यवस्थापन क्षेत्रात पुन्हा एकदा देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या ६व्या राष्ट्रीय जल पुरस्कारात राज्य श्रेणीत महाराष्ट्राला बहाल झालेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महामहीम राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारण्यात आला. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री मा.श्री. सी.आर. पाटील तसेच जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. दिपक कपूर उपस्थित होते.
मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील जलसंपदा विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने घेतली आहे. राज्यात जलसंवर्धन, धरण सुरक्षा, सिंचन प्रकल्प आणि पाणी पुनर्वापर यांसारख्या महत्वाच्या उपक्रमांना मोठी गती मिळाली आहे.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘जलसमृद्ध भारत’ या संकल्पनेला महाराष्ट्राने प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवले आहे. या यशाचे श्रेय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रभावी नेतृत्वाला आणि महायुती सरकारच्या सामूहिक प्रयत्नांना जाते. हा पुरस्कार दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला मिळालेला बळकटीकारक टप्पा आहे.

राहता
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





