best news portal development company in india

सिन्नर बसस्थानकात एसटीची धडक
बालक ठार, तीन प्रवाशी जखमी
संतप्त प्रवाशांचा रास्ता रोको….

SHARE:

प्रतिनिधी भाऊसाहेब हंडोरे ए वन न्यूज महाराष्ट्र सिन्नर


     सिन्नर : येथील बसस्थानकावर बुधवारी (दि.१९) सकाळी साडेदहाच्या सुमारास अनियंत्रित सिन्नर-देवपूर एसटी बसच्या धडकेत एका बालकाचा मृत्यू झाला तर, तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. यानिमित्ताने फलाटांची उंची वाढविण्याची गरज प्रकर्षाने समोर आली आहे.


आदर्श योगेश बोराडे (वय ९) असे मृत मुलाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, आदर्श, त्याची आई गौरी योगेश बोऱ्हाडे (दापूर, ता. सिन्नर), आजी विठाबाई ज्ञानेश्वर भालेराव, आजोबा ज्ञानेश्वर रामकृष्ण भालेराव (रा. तामकडवाडी, ता. सिन्नर) यांच्यासह काही प्रवासी फलाटावर बसची वाट बघत उभे होते. नियंत्रण सुटलेल्या बसने थेट फलाटावर धडकत तीन ते चार जणांना चिरडले. या अपघातात आदर्श बोऱ्हाडे हा बालक गंभीर जखमी झाला. तर, आई गौरी, आजी विठाबाई व ज्ञानेश्वर भालेराव यांच्यासह मीराबाई आव्हाड, वनिता मोहिते आदी जखमी झाले.
गेल्यावर्षीही घेतला महिलेचा बळी गेल्यावर्षी शिर्डीहून नाशिकला जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने मेळा बसस्थानकातील एका महिलेचा बळी गेला होता. तसेच, दोन जण गंभीर जखमी झाले होते. मेळा बसस्थानकात आलेली ई-बस फलाटावर चौकशी कक्षासमोर थांबली होती. यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस चौकशी कक्षासमोर उभ्या तिघांना धडकली होती.


     गंभीर जखमी आदर्शला डोक्याला जबर मार लागल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. त्याला उपचारांसाठी नाशिकला नेताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बोऱ्हाडे कुटुंबासह गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर संतप्त नागरिक व नातेवाईकांनी नाशिक-सिन्नर महामार्गावर रास्ता रोको करत निषेध नोंदवला. उदय सांगळे, हेमंत वाजे व नामदेव लोंढे यांनी घटनास्थळी येऊन एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला. नादुरुस्त बस रस्त्यावर का सोडली, बसस्थानकातील बेशिस्तीवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे, “ए वन न्यूज महाराष्ट्र”
सिन्न
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई