
प्रतिनिधी:किसन सोनवणे,ए वन न्यूज महाराष्ट्र,
कोपरगाव ::- तालुक्यातील कारवाडी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे अनुदान जाहीर केले, त्या अनुदानापासून कोपरगाव तालुक्यातील अनेक वयोवृद्ध शेतकरी पंचनामा न झाल्यामुळे वंचित राहिलेले आहे. अशाच प्रकारे कारवाडी येथील रामकृष्ण कुंडलिक बनकर यांच्या आजारीपणामुळे दवाखान्यात होते. त्यांच्या शेताचा पंचनामा झालेला नाही.अतिवृष्टीमुळे मकाचे पूर्ण नुकसान झाले होते,परंतु सदर शेतकऱ्याला अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.
त्याकरता त्यांनी मान्य तलाठी साहेब माननीय सर्कल साहेब माननीय तहसीलदार साहेब माननीय उपजिल्हाधिकारी साहेब माननीय प्रांत साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब याद्वारे पत्र व्यवहार केला आहे, तरी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मिळणारा मोबदला मिळणे कामी निवेदन दिले आहे,तरी सदर निवेदनाचा विचार करून सदर शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी पत्राद्वारे रामकृष्ण कुंडलिक बनकर या 91 वर्षाच्या शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत निश्चितच सरकारने न्याय द्यावा… अशी मागणी शेतकरी. कडून करण्यात आली….
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





