best news portal development company in india

भगवान बिरसा मुंडा जयंती सरस्वती विद्यामंदिर लासलगाव येथे उत्साहात साजरी…

SHARE:



प्रतिनिधी :  अनिल डोमाडे,लासलगाव

लासलगाव दि.१५ नोव्हेंबर सरस्वती विद्यामंदिर लासलगाव शाळेमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर हा पंधरवडा साजरा केला जातो.या ‘जनजाती गौरव पंधरवडा’ म्हणून आदिवासी लोककला आणि परंपरांची माहिती जमविणे ,वारली पेंटिंग प्रदर्शन ,आदिवासी संस्कृती ,लोक जीवन प्रदर्शन इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वारली चित्रांचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी लोक कलेवर आधारित सांस्कृतिक नृत्य सादर केले.आदिवासी नृत्य व कलाविष्कार ,भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी ओळख आदी उपक्रम आयोजित केले.



कार्यक्रमाचे सुरुवात प्रतिमा पूजन करून  विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय नेत्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने  प्रणाली भातोडे, दुर्वा शिंदे, ईश्वरी ठोंबरे, ओम आघाव या विद्यार्थ्यांनी तर अध्यक्ष भाषणात भीमराव शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वृंद कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनाथ जिरे यांनी केले.

प्रतिनिधी:- अनिल डोमाडे,लासलगाव
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई