प्रतिनिधी भाऊसाहेब हंडोरे,सिन्नर
सिन्नर , दि ; 16 नोव्हेंबर — नगरपरिषद निवडणुकीत सिन्नर मध्ये राजकीय समीकरणे जुळवून घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने बैठकांच सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र परंतु एके काळी शिवसेना चा बालेकिल्ला समजला जाणारा सिन्नर तालुक्यातील ठाकरे गटाला एकामागून एक जोरदार धक्के बसत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता येथील स्थानिक नेतृत्वाच्या दुटप्पी भूमिका व धोरण कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.मात्र याचा परिणाम तालुक्यातील सर्वसामान्य जनता द्विधा मनःस्थितीत आहे,परंतु एके काळी ज्यांच्या भरवशावर मंत्री माणिकराव कोकाटे यांना शह देण्यासाठीच सक्रिय सहभाग घेणारे उदय सांगळे. भारत कोकाटे. आणि खासदार राजाभाऊ वाजे यांचें काका व माजी नराध्यक्ष हेमंत वाजे यांनी ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर या मातब्बर नेत्यांनी साथ सोडून सत्ताधारी पक्षाच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व खासदार वाजे यांना जोरदार धक्का दिला.

हेमंत वाजे यांनी सांगितले की सिन्नर मध्ये अजुन बरीच मोठी कामे पूर्ण नाही ते पुर्ण व नवीन कायापालट करण्यासाठी विकासाच्या मुद्यावर लढणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण स्पष्ट केले आहे. परंतु भाजपमधुन आलेले उदय सांगळे यांनी ठाकरे गाटाचे तत्पूर्वी चे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून उदय सांगळे यांच्या पत्नी शितलताई सांगळे यांना संधी दिली.असे असतानाच नाशिक लोकसभा निवडणुकीत उदय सांगळे यांनी उघडपणे खासदार वाजे यांना विरोध करून माजी खासदार हेमंत गोडसे यांना साथ दिली होती. मात्र याच काळात एक सिन्नरचा माणूस खासदार होतोय याची दखल घेऊन मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विरोधी पक्षात असतांना खासदार वाजे यांना आतुन मदत केली.. या सर्व गोष्टींची परतफेड म्हणून मागील विधानसभा निवडणुकीत उदय सांगळे यांच्या विरोधात काहीशी दुटप्पी भूमिका घेतली खासदारकीच्या निवडणुकीचा वचपा काढला.. आणि माणिकराव कोकाटे यांच्या परतफेड करत उदय सांगळे यांनी पराभुत करण्यात कारणीभूत ठरले अशी भावना झाल्यानंतर उदय सांगळे काहीशे नाराज असल्याचे दिसत होते. योग्य वेळी उदय सांगळे यांनी शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच मंत्री कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला.

त्या पाठोपाठ खुद्द ठाकरे गटाचे नेते व खासदार राजाभाऊ वाजे यांचें काका व माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांनी सुद्धा श्री.वाजे यांना सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.. त्यामुळे एकापाठोपाठ एक धक्क्याने सिन्नर मध्ये उद्धव ठाकरे गटाला तिहेरी धक्का बसला असून पक्षाला खिंडार पडले आहे.. या सर्व पार्श्वभूमीवर सिन्नरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून खासदार राजाभाऊ वाजे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
परंतु तालुक्यातील राजकारण मात्र मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भोवती फिरत असतं या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री कोकाटे यांच्या कडून काय रणनीती आखली जाते हे पहाणं महत्वाचे ठरणार आहे..
विरोधांकाच्या एकमेकांच्या परतफेडीसाठी स्वतः च्या पक्षातील नेत्यांच्या जिरवा जिरवी नादात तथापि या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याची चर्चा सुरू आहे.. त्याचाच हा एक भाग म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
उदय सांगळे यांच्या शहला काट शह देण्यासाठी मंत्री माणिकराव कोकाटे व खासदार राजाभाऊ वाजे हे नेमकी काय भूमिका घेतात आणि कोणती राजकीय खेळी करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.. या सर्व घडामोडी मुळे सिन्नर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहे हे निश्चित ….


सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





