best news portal development company in india

अपघाती निधन झालेल्या आशा सेविका विमल भोसले यांच्या कुटुंबाला संघटनेचा मदतीचा हात..

SHARE:

प्रतिनिधी:एवन न्युज महाराष्ट्र,कोल्हार

ता. १ जून २०२६


कोल्हार: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या आशा सेविका श्रीमती विमल भोसले यांचे नुकतेच कर्तव्य बजावत असताना दुःखद निधन झाले. २३ मे २०२६ रोजी शासकीय सर्वेक्षणाचे काम करत असताना त्यांना अचानक चक्कर येऊन त्या खाली पडल्या. त्यानंतर त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांचे निधन झाले.
विमल भोसले यांच्या पश्चात धनंजय व गगन हे दोन मुले तसेच सुवर्णा ही मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी राहाता आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती देण्यात आली.
अनेक वर्षांपासून आशा सेविका म्हणून प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या विमल भोसले या आशा कर्मचारी संघटना (आयटक सलग्न) यांच्या सक्रिय सदस्य होत्या. त्यांच्या निधनानंतर संघटनेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन आर्थिक मदतीचा धनादेश त्यांच्या मुलगा धनंजय आणि मुलगी सुवर्णा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
हा धनादेश आशा सुपरवायझर सौ. रेणुका निर्मळ, सौ. वर्षा मांडुळे आणि संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ. सुरेश पानसरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी आशा कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. ज्योती पंडुरे तसेच आयटकच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. जयश्री गुरव उपस्थित होत्या.
या प्रसंगी आशा कर्मचारी सौ. सोनाली शेजुळ, शशिकला गायकवाड, मंदाकिनी ब्राम्हणे, अश्विनी गोसावी, मनीषा मुनमुणे, शोभा शिंदे, सविता राजभोज, निर्मला राजभोज आदी कर्मचारी उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्हा आशा कर्मचारी संघटना (आयटक सलग्न) ही संघटना जिल्ह्यातील आशा कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असते. विमल भोसले यांच्या निधनाबाबत भावना व्यक्त करताना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी सांगितले की, “विमलताईंचे अपघाती निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. संघटनेने केलेल्या आर्थिक मदतीमुळे त्यांची उणीव भरून निघणार नाही, परंतु त्या आपल्या संघटनेच्या सदस्य होत्या. त्यांच्या दुःखात संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा आशा कर्मचारी संघटना सहभागी असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.”

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई