best news portal development company in india

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त फलटणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार….

SHARE:

प्रतिनिधी:एवन न्युज महाराष्ट्र,फलटण……….
फलटण : पुण्यश्लोक महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 31 मे 2026 रोजी रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या यशाचा गौरव व्हावा आणि भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

फलटण एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्रीराम एज्युकेशन सोसायटी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सौ. वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जय भवानी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तिरकवाडी तसेच कुरेशी मोहल्ला उर्दू स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील इयत्ता दहावी व बारावीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विविध मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

या वेळी इयत्ता दहावी तसेच बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.कु. सानिका रमेश सोनवलकर हिचा सत्कार श्री. अप्पासाहेब कापसे व श्री. बजरंग गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.कु. वैष्णवी राहुल शिंदे हिचा सत्कार माजी सभापती श्री. शंकराव माडकर व मालोजी बँकेचे संचालक श्री. भानुदास सरक यांच्या हस्ते झाला.
चि. साहिल नंदकुमार जाधव याचा सत्कार माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. महादेव पोकळे व माजी पंचायत समिती सदस्य श्री. बापूराव गावडे यांनी केला.
कु. श्रेया नितीन कदम हिचा सत्कार नगरसेवक श्री. संदीप चोरमले व प्रगतशील शेतकरी श्री. रमेश गावडे यांच्या हस्ते झाला.
चि. गौरव सुनील धालवडे याचा सत्कार माजी सभापती श्री. रामभाऊ ढेकळे व श्री. भीमराव बुरुंगले सर यांनी केला.
कु. सृष्टी चंद्रकांत लोणकर हिचा सत्कार डॉ. श्रुती विक्रांत थिटे व माजी प्राचार्य सौ. शाहीन इस्माईल शेख यांच्या हस्ते करण्यात आला.
कु. सुप्रिया संतोष आंधळे हिचा सत्कार श्री. सांगळे अण्णा (पटकरी) व श्री. पोकळे यांच्या हस्ते झाला.
कु. अंकिता सुरेश मसुगडे हिचा सत्कार पोलीस उपनिरीक्षक सौ. आयोध्या घोरपडे व रणरागिणी संस्थेच्या संचालिका सौ. रझिया शेख यांनी केला.
कु. श्रेया हिम्मत फरांदे हिचा सत्कार श्री. भाऊसाहेब कापसे व नगरसेवक श्री. जाधव यांच्या हस्ते झाला.
कु. संस्कृती विजय फरांदे हिचा सत्कार बिल्डर श्री. भगवान लकडे व प्रगतशील बागायतदार श्री. तुकाराम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.याशिवाय उर्दू शाळेतील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. इरम अक्रम बेपारी व इयत्ता बारावीची विद्यार्थिनी कु. जोया मोसिन कुरेशी यांचा विशेष सत्कार त्यांच्या शाळेत जाऊन करण्यात आला. हा सत्कार रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या संचालिका सौ. रझिया शेख, संस्थेचे सचिव श्री. मारुती टकले आणि माजी प्राचार्य सौ. शाहीन शेख यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करत त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करून त्यांना भविष्यात अधिक मोठी उद्दिष्टे गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श विचारांचा वारसा जपत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेने एक आदर्श सामाजिक उपक्रम राबविल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई