
प्रतिनिधी निफाड
निफाडचा : पारा ९.२ अंशांवर; थंडी अजून वाढणार
राज्यात हवामान कोरडे झाल्याने आणि उत्तरेकडून प्रतितास १० ते १२ किलोमीटर वेगाने थंड वारे वाहत असल्यामुळे पुढील ब्ली तीन दिवस नाशिक जिल्ह्यात थंडीची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तविला जात असून, काल गुरुवारी नाशिकमध्ये १०.३ अंश पचे सेल्सिअस तर निफाडमध्ये ९.२ ब्ली अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कडे झाली असून, पुढील काही दिवस थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
जिल्ह्याचा कॅलिफोर्नियामधून
निफाड तालुक्याची ओळख असून, येथे दरवर्षी थंडी नवनवे विक्रम प्रस्थापित करीत असते. निफाड तालुक्यात काल गुरुवारी ९.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले असून, निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर, सुकेणे, चांदोरी, सायखेडा, म्हाळसाकोरे, देवगाव, निफाड या परिसरात थंडीचा माहोल अधिक दिसून येतो. तापमान झपाट्याने खाली येत असल्याने पुढील तीन दिवस थंडीत अधिक वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

सध्या दिवसाही थंडगार वारे वाहत असल्याने सकाळ, सायंकाळ मोठ्या प्रमाणात गारवा जाणवत आहे. तर रात्री आठनंतर आणि पहाटे ग्रामीण भागातील रस्ते काहीसे सुनसान होत आहेत. साहजिकच वाढत्या थंडीचा सामना जसा मानवास करावा लागत आहे तसाच मुक्या प्राण्यांनादेखील करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, थंडी-ताप असे साथीचे आजार होण्याची
शक्यता असल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र, हीच वाढती थंडी गहू, हरभरा, कांदा पिकासाठी पोषक ठरत असून, द्राक्षबागेसाठी मात्र तापदायक ठरण्याची शक्यता आहे. सध्या साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने तालुक्याच्या गोदाकाठ भागात ऊस तोडणी मजुरांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असून, या कामगारांनी उघड्यावर संसार थाटल्याने या वाढत्या थंडीची झळ या कुटुंबीयांना सहन करावी लागत आहे.


Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





