best news portal development company in india

बेशिस्त चालकांवर सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांव्दारे ऑनलाईन ई-चलान देत होणार कारवाई….                              नाशिक शहरात ८१९ रिक्षाचालकांवर कारवाई, २५ रिक्षा स्क्रॅप…  वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन न केल्यास पालन करण्यासाठी २ तासांचे प्रशिक्षण देणार…..

SHARE:

प्रतिनिधी नाशिक


नाशिक । शहरातील जे वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना एकत्रित करून ट्राफिक एज्युकेशन पार्क मुंबईनाका याठिकाणी वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी  २ तासांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांव्दारे ऑनलाईन ई-चलानव्दारे कारवाई करण्यात येणार आहे. जे वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर पोलीस व आरटीओमार्फत वेळोवेळी विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
      नागरिकांच्या वाहतुकीसंदर्भात व बेशिस्त रिक्षाचालकांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांना सुरक्षित व शिस्तबध्द वाहुतू व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने व वाहतूक विभागाच्या उपायुक्त किरिथिका सी. एम. व सहायक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नाशिक शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या कारणांमुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे.


      नाशिक शहरातील बेशिस्त वाहनचालक हे सिग्नल जंप करणे, स्टॉपलाईनवर न थांबणे, विरूध्द दिशेने वाहन चालविणे, सिटबेल्ट न लावणे, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, ट्रिपलसिट बसणे, रिक्षाचालकांनी जादाप्रवासी वाहतूक करणे, युनिफॉर्म न घालणे, लायसेन्स व परवाना सोबत न बाळगणे, काळी फिल्मचा काचेवर वापर करणे, फन्सी नंबर प्लेट लावाणे, विनानंबर प्लेट वाहन चालविणे, कालबाहय मुदतीचे वाहन चालविणे, वाहतुकीस अडथळा होईल असे बेशिस्तपणे रस्त्यांवर वाहन पार्क करणे यामुळे नाशिक शहरातील वाहतूक समस्या होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. सुरळीत वाहतूक व अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. 

           ८१९ रिक्षाचालकांवर कारवाई, २५ रिक्षा स्क्रॅप
पोलिसांनी विशेष  मोहिमेअंतर्गत बेशिस्त रिक्षाचालक व मालकांवर बीएनस २८५ प्रमाणे १०३ गुन्हे, एमव्हीए नुसार ६०३ एनसी खटले दाखल करून एकून ८१९ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. आरटीओ व वाहतूक विभाग संयुक्त कारवाईमध्ये ११८ रिक्षांवर कारवाई करण्यात आली असून, ३५ रिक्षा स्क्रॅप करण्यात आल्या आहेत. तसेच, एमव्हीएनुसार ईचालनव्दारे रिक्षा व इतर वाहनांवर २४१५ केसेस व १८ लाख ७४ हजार ८५० रूपये दंड ऑनलाईन स्वरूपात आकारण्यात आला आहे.

       वाहतूकसंदर्भात तक्रारी असल्यास नागरिकांनी सीपी व्हाट्सअॅप क्र. ९९२३३२३३११ वर किंवा आपली तक्रार सादर करू शकतात.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई