प्रतिनिधी ज्ञानेश्वर सांगळे
नाशिक:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी,शेतीमालाला हमीभाव मिळावा ,पेरणी ते कापणी सर्व कामे एम.आर. इ.जी.एस. मधून करण्यात यावे.दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन करण्यात यावे.
या मागणी सह इतर मागण्यांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. मंत्री बच्चू भाऊ कडू यांचे नेतृत्वात राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
आणि नाशिक शहरातील मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आडगाव नाका,पंचवटी येथे प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक शहर प्रमुख श्याम गोसावी,निवृत्ती धात्रक यांच्या नेतृत्वात सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना,सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांना सोबत घेऊन हा महामार्ग अडवत चक्काजाम आंदोलन करून सरकारला शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांची आठवण करून देण्यात आली.
आजच्या या आंदोलनातून सरकारने जागे होऊन त्वरित शेतकरी कर्जमाफी व सर्व मागण्या मंजूर कराव्यात,अन्यथा पुढील काळात मा.मंत्री बच्चु भाऊ कडू यांच्या आदेशानुसार व सर्व शेतकरी बांधवांना एकत्र घेऊन शेतकरी संघटना एकत्र घेऊन यापुढे मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असे श्री.दत्तू बोडके,श्री.राजू देसले, श्री.नाना बच्छाव, श्री.शरद शिंदे संध्याताई जाधव यांनी सांगितले
या आंदोलन प्रसंगी दत्तू बोडके श्याम गोसावी राजू देसले नाना बच्छाव,शरद शिंदे,निवृत्ती धात्रक,संध्याताई जाधव,शोभाताई काळे,रेखाताई जाधव,वैशालीताई अनवट,मुकेश गांगुर्डे,अमजद पठाण,उमेश शिंदे,जगन काकडे,करण गायक, मुकेश गोसावी,सुशील शिंदे,संदीप आवारे,विकास रसाळ,कमलाकर शेलार,मदन बोधले व प्रहार जनशक्ती पक्ष व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ,कार्यकर्ते , शेतकरी बांधव उपस्थित होते….
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






