शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांच्या अन्य १७ मागण्यांसाठी एकत्रित लढा….
प्रतिनिधी चांदवड: ता. २४ जुलै– प्रहार जनशक्ती पक्ष व , चांदवड तालुका यांच्या वतीने आज मुबंई आग्रा महामार्गावर चांदवड चौफुली येथे शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग बांधवांच्या विविध सतरा मागण्यांसाठी भव्य सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
आंदोलन पूर्णतः शांततामय, शिस्तबद्ध व लोकशाही मार्गाने पार पडले. आंदोलनात शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, शेतमजूर, तरुण व विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दीड तास मुंबई अग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शेवटी पोलीस प्रशासनाने आंदोलकाची धरपकड करूनआंदोलकांना ताब्यात घेतले.
चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांची कैवारी श्री गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.आंदोलनात उपस्थित प्रकाश चव्हाण, समाधान बागल,चंद्रकांत जाधव, संदीप जाधव, हरिभाऊ सोनवणे, उशीरतात्या, विनोद शिंदे,समाधान भोईटे नामदेव पवार गौरव पवार गणेश तिडके, गणेश पाचोरकर,सचिन जाधव हिरामण निकम, रेवण गांगुर्डे, पिंटू तिडके,विविध संघटनांचे व पक्षांचे प्रतिनिधीही सामील झाले होते. प्रहार संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, सहभाग नोंदवला.
पोलीस प्रशासनाने शांतता राखण्यासाठी योग्य बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पार पडले.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......










