प्रतिनिधी

फलटण (जि. सातारा): बुद्ध जयंती व पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या त्रिस्मरणीय दिवसांच्या औचित्याने रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने उत्साहपूर्ण अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजघटक म्हणून मोलाचे योगदान देणाऱ्या कामगारांचा संस्थेकडून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष इम्रान सिकंदर सय्यद, अतुल शाह, खजिनदार कैफ शेख, सचिव मारुती टकले, संचालिका (माजी प्राचार्य) शाहीन शेख, रझिया शेख, माया बनसोडे, उपशिक्षक सीमा हिंदुराव मुळीक, सविता शिंदे, अनिसा सय्यद, प्रीती शाह, हिना सय्यद, सना शेख यांसह डिजिटल मीडिया संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक-संचालिका व इतर सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान कामगारांच्या परिश्रमांचे कौतुक करून त्यांना मानचिन्ह देत गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी कामगार हे समाजविकासाचे खरे शिल्पकार असल्याचे अधोरेखित केले. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवर, सभासद आणि कामगार बांधवांचे आभार मानण्यात आले.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





