प्रतिनिधी – निवृत्ती पगार, कोळपेवाडी(कोपरगांव)
कोपरगांव:मराठी साहित्याची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विधिमंडळ मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष दादा काळे यांच्या संकल्पनेतून कृष्णाई मंगल कार्यालय येथे रंगलेली काव्यमैफल काव्यरसिकांसाठी अविस्मरणीय ठरली. बहारदार कवितांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष उंची लाभली.

कार्यक्रमास मराठी भाषा समितीचे सदस्य आमदार संजय जी केनेकर व आमदार प्रा. रमेश जी बोरणारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सुप्रसिद्ध कवींच्या प्रभावी सादरीकरणामुळे सभागृहातील वातावरण अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.

या काव्यमैफलीत आबाजी पाटील, नितीनजी चंदनशिवे, गुंजन ताई पाटील, लताताई येवले, तालीमजी सोलापुरी, अबे दाजी शेख, शशिकांत शिंदे आणि संदीप जी काळे यांनी आपल्या काव्यरचना सादर करत रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट व खुमासदार सूत्रसंचालन इंद्रजीत घुले यांनी केले.

या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, साहित्यिक, तसेच कलाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. काव्य, साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव ठरलेली ही काव्यमैफल कोपरगावच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारी ठरली.

संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड व9422952513
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे – 9637100608

एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





