प्रतिनिधी : किसन सोनवणे,कारवाडी ता.कोपरगाव
कोपरगाव:तालुक्यातील कारवाडी येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्रामसभेत कृषी विभाग, पंचायत समिती, महसूल विभाग तसेच बँकांचे एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि २ ऑक्टोबर या अत्यंत महत्त्वाच्या ग्रामसभा असतात. या ग्रामसभांमधून शासनाच्या विविध योजना ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवायच्या असतात. मात्र, संबंधित विभागांचे अधिकारीच गैरहजर राहिल्यास ग्रामीण जनतेला योजनांची माहिती देणार तरी कोण? असा थेट सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
कारवाडी गावात गेल्या तब्बल १३ वर्षांपासून पाठाच्या कडेला पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदण्यात आली, मात्र आजतागायत त्या विहिरीवर डीपी बसवणे किंवा पाणीपुरवठ्याची कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तसेच, गावासाठी मंजूर झालेला सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी अद्याप प्रत्यक्ष कामात उतरलेला नसून, संबंधित विकासकामे आजही बंद अवस्थेत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अशाच प्रकारच्या समस्या असून, त्या सोडवायच्या तरी कोण? असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
या ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते व टायगर फोर्सचे जिल्हाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) किसनराव सोनवणे यांनी वरील सर्व गंभीर प्रश्न ठामपणे उपस्थित करत ग्रामपंचायत कारवाडीने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.
याशिवाय, गेल्या दोन वर्षांपासून कारवाडी येथील युवकांनी क्रीडा साहित्याची मागणी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे केली आहे. ग्रामपंचायतीने वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवूनही आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे योजना फक्त कागदावरच राबवल्या जात आहेत का? असा संतप्त सवाल युवकांनी उपस्थित केला आहे.
सदर सर्व प्रश्न एका महिन्याच्या आत सुटले नाहीत, तर कोपरगाव पंचायत समिती कार्यालयावर भव्य स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ग्रामसभेत देण्यात आला.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





