सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “Aone News Maharashtra“
ज्ञानेश्वर सांगळे,नाशिक
नाशिक:राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची मागणी करणे जर गुन्हा ठरत असेल, तर या राज्यात लोकशाही उरली आहे का? असा थेट सवाल आता सामान्य नागरिकांपासून महिला कर्मचाऱ्यांपर्यंत उपस्थित केला जात आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या एका कार्यक्रमात भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने संतप्त झालेल्या वन रक्षक माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी बाबासाहेबांचे नाव घेण्याची विनंती केली. मात्र या मागणीमुळेच त्या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
“सस्पेंड केलं तरी चालेल, पण बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही,” असे स्पष्ट मत व्यक्त करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांना थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले, ही घटना राज्याच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.
या घटनेमुळे सरकारच्या तथाकथित ‘लाडकी बहीण’ योजनेचा खरा चेहरा समोर आला असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या राज्यात बहिण फक्त नावालाच लाडकी आहे का? तिच्या भावना, तिचा स्वाभिमान आणि तिचा घटनात्मक हक्क यांना काहीच किंमत उरलेली नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आज देश चालतो, ज्या संविधानामुळे आपल्याला प्रजासत्ताक दिन साजरा करता येतो, त्या बाबासाहेबांचे नाव घेण्याचा सल्ला दिल्यावर जर सरकारी महिला कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेले जात असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आणि लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरी संघटनांकडून व्यक्त केले जात आहे.
या प्रकरणात सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, महिला कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घ्यावी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान राखण्याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

एवन न्यूज महाराष्ट्र
नाशिक
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





