best news portal development company in india

महाराष्ट्राच्या लोककलेला राष्ट्रीय सन्मान!
‘तमाशा सम्राट’ रघुवीर खेडकर यांना २०२६ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर …🎖️

SHARE:

प्रतिनिधी निवृत्ती पगार कोळपेवाडी

कोळपेवाडी:महाराष्ट्राच्या मातीतील लोककला, गावगाड्याचा श्वास असलेल्या तमाशा या लोकनाट्य प्रकाराला राष्ट्रीय पातळीवर मानाचा मुजरा मिळाला आहे. लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ व दिग्गज कलावंत, दिग्दर्शक आणि फड मालक रघुवीर खेडकर यांना भारत सरकारतर्फे २०२६ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तमाशा या लोककलेसाठी त्यांनी दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल, तसेच कलेचे जतन, संवर्धन व पुढील पिढीपर्यंत ती पोहोचवण्याच्या कार्यासाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.


पद्मश्री पुरस्काराची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रातून रघुवीर खेडकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. कलाकार, रसिक, लोककला अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.

रघुवीर खेडकर हे तमाशा क्षेत्रातील एक दिग्गज नाव म्हणून ओळखले जातात. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते तमाशा रंगभूमीवर अविरत कार्यरत आहेत. तमाशा केवळ मनोरंजन न ठेवता तो सामाजिक प्रबोधनाचा, संस्कृतीचा आणि ग्रामीण जीवनाचा आरसा कसा ठरू शकतो, हे त्यांनी आपल्या कलेतून सातत्याने दाखवून दिले.

त्यांची कला परंपरा ही थोर तमाशा कलावंत आई कांताबाई सातारकर यांनी शिवबाळावर सुरू केलेल्या तमाशा फडापासून सुरू झाली असून, ती परंपरा आजही त्यांनी जपून ठेवली आहे. बदलत्या काळात तमाशा टिकवून ठेवताना त्यांनी आशय, सादरीकरण आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख मेळ घातला.

रघुवीर खेडकर हे महाराष्ट्र राज्य ढोलकी फड संघटनेचे अध्यक्ष असून, तमाशा फड मालक आणि कलाकार या दोन्ही भूमिकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, तमाशा क्षेत्रात शिस्त, सन्मान आणि व्यावसायिकता रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.

संगमनेर तालुक्याचे सुपुत्र असलेल्या रघुवीर खेडकर यांचा हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून, संपूर्ण तमाशा परंपरेचा आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा गौरव मानला जात आहे. त्यांच्या पद्मश्री पुरस्कारामुळे ग्रामीण लोककलेला नवी ऊर्जा मिळेल, अशी भावना तमाशा रसिकांमधून व्यक्त होत आहे.

तमाशा रंगभूमीवरून थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचलेला हा प्रवास, अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई