best news portal development company in india

“शेतात काही पेरा, कर्जात उगवतं!” – कांद्याला मातीमोल भाव; सिन्नर बाजारात शेतकऱ्यांची आर्त हाक…

SHARE:


प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे, एवन न्यूज महाराष्ट्र सिन्नर

सिन्नर:“शेतात राब राब राबायचं आणि बाजारात मालाला कवडीमोल भाव!” अशी संतप्त प्रतिक्रिया सध्या सिन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून उमटत आहे. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन दिवसांपासून कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

काही दिवसांपूर्वी अडीच ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळणारा कांदा, आज चांगल्या दर्जाच्या मालालाही केवळ एक हजार ते बाराशे रुपये दराने विकला जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्च आणि मिळणारा दर यांचा ताळमेळच बसत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

खत, बियाणे, मजुरी, पाणी, वाहतूक यांसारख्या वाढत्या खर्चामुळे कांद्याची शेती आधीच महागडी ठरते आहे. अशा परिस्थितीत बाजारात मिळणारा कमी दर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरत आहे. “किमान खर्च तरी निघावा,” अशी अपेक्षा असताना बाजारातील दरांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी किमान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची ठाम मागणी केली आहे. अन्यथा कांदा उत्पादन परवडेनासे होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याच्या दरात स्थिरता आणावी, अन्यथा शेतकरी आंदोलनाच्या मार्गावर जाऊ शकतो, असा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे.

एकीकडे शेतकरी दिवस-रात्र शेतात राबतो, तर दुसरीकडे बाजारात त्याच्या घामाच्या किमतीला योग्य मोबदला मिळत नसल्याने “शेतात काही पेरा, पण उगवतं मात्र कर्जच!” अशी विदारक अवस्था सध्या सिन्नर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई