best news portal development company in india

पाचोरे खुर्दमध्ये तुकाराम बाबा देवस्थान जमिनीचा ५ वर्षांसाठी जाहीर लिलाव; भाऊसाहेब वाघ यांची ₹२.५२ लाखांची विजयी बोली…

SHARE:

प्रतिनिधी:नाना सांगळे,नाशिक
पाचोरे खुर्द : गावातील श्रद्धास्थान असलेल्या तुकाराम बाबा देवस्थानच्या जमिनीचा जाहीर लिलाव गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आणि एकमताने पार पडला. पारदर्शक पद्धतीने झालेल्या या प्रक्रियेत अंतिम बोली ₹२,५२,००० (दोन लाख बावन्न हजार रुपये) इतकी लागली. लिलाव ५ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आला आहे.
लिलावाची सुरुवात इच्छुक उमेदवारांकडून ₹५,००० डिपॉझिट स्वीकारून करण्यात आली. या प्रक्रियेत भाऊसाहेब वाघ, खंडू आंधळे आणि खंडू सानप यांनी सहभाग नोंदवला. चढाओढीच्या बोलीनंतर अखेरीस भाऊसाहेब वाघ यांनी ₹२.५२ लाखांची सर्वोच्च बोली लावत लिलाव जिंकला.
संपूर्ण लिलाव ग्रामस्थांसमोर उघडपणे पार पडला. गावचे पोलीस पाटील, समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी आधीच जाहीर संमती घेण्यात आली होती.
लिलावातून प्राप्त होणारी रक्कम तुकाराम बाबा मंदिराच्या देखभाल व विकासासाठी वापरण्यात येणार असून, त्याचबरोबर लक्ष्मी माता मंदिर उभारणीसाठी देखील निधी वापरला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून झालेल्या या लिलावामुळे देवस्थानाशी संबंधित व्यवहार पारदर्शकतेने आणि लोकसहभागातून कसे पार पाडावेत, याचा आदर्श पाचोरे खुर्द गावाने घालून दिला आहे. गावात या निर्णयाबाबत समाधानाचे वातावरण आहे.

सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्यूज महाराष्ट्र” संपादक: अरुण चंद्रभान गायकवाड ,9422952513
उपसंपादक :ज्ञानेश्वर यशवंत सांगळे, 9637100608
नाना सांगळे नाशिक
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई