नाशिक | प्रतिनिधी
राज्यात वाढत चाललेल्या अनाधिकृत बाइक टॅक्सी सेवांवर अखेर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये ओला, उबर, रॅपिडो आदी अॅपच्या माध्यमातून परवानगीशिवाय सुरू असलेल्या बाइक टॅक्सीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट पोलिस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत.या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवून अनधिकृत बाइक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यास तसेच संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.पत्रात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्रात सध्या अनेक भागांत बाइक टॅक्सी सेवा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, या सेवांसाठी परिवहन विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना प्रवासी वाहतूक केली जात आहे. हे सरळसरळ मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.परिवहन मंत्र्यांनी नमूद केले आहे की, या अनधिकृत बाइक टॅक्सी चालवणाऱ्या चालकांची कोणतीही शासकीय पडताळणी नसते. त्यांच्याकडे वैध बॅज, परवाना, विमा किंवा प्रवासी संरक्षणाची कोणतीही हमी नसते. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ही सेवा अत्यंत धोकादायक ठरू शकते.विशेष म्हणजे, अशाच एका प्रकरणात महिला प्रवाशासोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली असून त्या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याचेही पत्रात नमूद आहे. त्यामुळे ही बाब केवळ वाहतूक नियमभंगापुरती मर्यादित नसून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही गंभीर असल्याचे स्पष्ट केले आहे.परवानाधारक रिक्षा, टॅक्सी चालक व वाहनमालक सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय करतात. मात्र, अनधिकृत बाइक टॅक्सीमुळे त्यांच्यावर अन्याय होत असून परिवहन व्यवस्थेत असंतुलन निर्माण होत आहे. ही परिस्थिती राज्याच्या वाहतूक व्यवस्थेसाठी घातक असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
परिवहन मंत्र्यांनी पोलिसांना निर्देश दिले आहेत अनधिकृत बाइक टॅक्सी सेवा तात्काळ बंद कराव्यात,संबंधित अॅप कंपन्यांचे स्थानिक प्रतिनिधी, चालक व मालकांवर गुन्हे दाखल करावेत,वाहन जप्तीची कारवाई करावी,भविष्यात अशी सेवा पुन्हा सुरू होणार नाही याची दक्षता घ्यावी.राज्य सरकार नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून, कायद्याचे उल्लंघन करून चालणाऱ्या कोणत्याही अनधिकृत व्यवसायाला पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या पत्रातून देण्यात आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासन कायदा व सुव्यवस्था तसेच प्रवासी सुरक्षिततेबाबत शून्य सहिष्णुतेची भूमिका घेत असल्याचे यावरून स्पष्ट होते.राज्यातील अनधिकृत बाइक टॅक्सी चालक व कंपन्यांसाठी ही कारवाई मोठा धक्का मानली जात असून, लवकरच राज्यभरात व्यापक मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





