best news portal development company in india

रस्त्याचे ‘डांबर’ गेले कुठे? कागदावर रस्ता चकाचक, प्रत्यक्षात मात्र धुळीचे साम्राज्य संगनमताने भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा खळबळजनक आरोप; चौकशीची मागणी…

SHARE:


प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर: तालुक्यातील शहा ते रामपूर (पुतळेवाडी) या दोन गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाल्याचे सांगितले जाते, मात्र आजही या रस्त्यावर डांबराचा एक थेंबही दिसत नाही. त्यामुळे या रस्त्याचे डांबर नक्की गेले कुठे? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. कागदोपत्री डांबरीकरण पूर्ण दाखवून निधी हडपल्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे.


शहा ते रामपूर (पुतळेवाडी) हा सुमारे तीन ते साडेतीन किलोमीटरचा रस्ता दोन्ही गावांतील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. साधारण दोन दशकांपूर्वी या रस्त्याचे काम मंजूर होऊन ते पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात या रस्त्याची स्थिती पाहता येथे कधी डांबरीकरण झाले होते की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. रस्ता आजही खडीकरण आणि मातीच्या अवस्थेत धुळ खात पडला आहे.
स्थानिक नागरिकांच्या चर्चेनुसार, त्यावेळचे तत्कालीन आमदार आणि संबंधित ठेकेदार यांच्या संगनमताने हे काम अर्धवट स्थितीत असतानाच पूर्ण झाल्याचे भासवले गेले. कागदोपत्री डांबरीकरण झाल्याचे दाखवून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “जर १५-२० वर्षांपूर्वी रस्ता झाला होता, तर त्याचे अवशेष तरी दिसायला हवे होते, पण येथे केवळ धूळ आणि खड्डेच शिल्लक आहेत,” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शालेय विद्यार्थ्यांची कसरत: हा रस्ता शालेय विद्यार्थ्यांच्या रोजच्या येण्या-जाण्याचा मुख्य मार्ग आहे. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अपघातांचे प्रमाण:अर्धवट खडीकरणामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
विकासाला खीळ:दोन गावांना जोडणारा हा दुवाच कमकुवत असल्याने परिसराच्या विकासावरही याचा परिणाम होत आहे.

“शहा-रामपूर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आता तरी झोपेतून जागे व्हावे. या रस्त्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करून नवीन रस्त्याला तातडीने मंजुरी द्यावी, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.”
ग्रामस्थ, शहा-रामपूर परिसर

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई