best news portal development company in india

सिन्नरचा पाणीप्रश्न सुटणार! आमदार माणिकराव कोकाटेंच्या पुढाकाराने १०० टँकर्सची ‘जलधारा’; दुष्काळग्रस्त गावांना मोठा दिलासा…

SHARE:

दि. १० मे २०२६ प्रतिनिधी: भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर : तालुक्यात सध्या जाणवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार माणिकरावजी कोकाटे यांनी कंबर कसली आहे. “प्रत्येक नागरिकापर्यंत पाणी पोहोचवण्याचा संकल्प” उराशी बाळगून, आमदार निधी आणि विशेष प्रयत्नांतून तब्बल १०० टँकर्सद्वारे तालुक्यातील तहानलेल्या गावांची तहान भागवण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.


     सिन्नर तालुका विभागीय दूध संघ, हरसुले येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त गावांसाठी पाण्याच्या टँकर्सचे रितसर वाटप करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टंचाईची तीव्रता लक्षात घेता, पहिल्या टप्प्यात तालुक्यातील अत्यंत गरजू गावांची निवड करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने: कनकोरी, शिदेवाडी, दातली, वडगाव सिन्नर, पाटोळे, भोकणी
मनेगाव, दोडी बु., धोंडवीरनगर, सोनांबे, आडवाडी, मीठसागरे
म्हाळ बु., पांगरी बु., घोटेवाडी, पिंपळे, पांगरी खु., वावी, सायाळे, देवपूर आणि दापूर या गावांना तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. भर उन्हात पाण्यासाठी वणवण करणाऱ्या माता-भगिनींच्या आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर टँकर पाहताच समाधान आणि दिलासा पाहायला मिळाला.

_________________________________________________

“पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हा माझा संकल्प आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि ठोस प्रयत्नांमुळे आज सिन्नरच्या पाणी प्रश्नाला मोठी गती मिळत आहे. जनतेच्या चेहऱ्यावरील समाधान हीच माझ्या कामाची खरी पावती आणि प्रेरणा आहे.”
  आमदार माणिकराव कोकाटे _________________________________________________

गेल्या काही काळापासून आमदार कोकाटे यांनी सिन्नरच्या पाणी प्रश्नावर शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. केवळ कागदोपत्री आराखडे न मांडता, थेट मैदानात उतरून १०० टँकर्सची सोय केल्याने तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे. “पाणी प्रत्येक घरापर्यंत” हे केवळ ब्रीदवाक्य न राहता ते आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.

सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा
“एवन न्यूज महाराष्ट्र”
संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड 9422952513,उपसंपादक: ज्ञानेश्वर यशवंत सांगळे 9637100508
प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
“एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई