best news portal development company in india

केद्राई माता मंदिर परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य; भाविकांकडून जबरदस्ती देणगीची तक्रार…

SHARE:

प्रतिनिधी:चांदवड,नाशिक

चांदवड (प्रतिनिधी): चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील केद्राई माता मंदिरात महाराष्ट्रभरातून भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात. मात्र मंदिर परिसरात साचलेली घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छता पाहून भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वच्छतेकडे मंदिर ट्रस्टचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.


भाविकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात कचऱ्याचे ढीग, सांडपाणी व दुर्गंधी यामुळे दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पावसाळी वातावरणात परिस्थिती अधिक बिकट होते. स्वच्छतागृहांची देखभाल अपुरी असून नियमित साफसफाई होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

याशिवाय, काही भाविकांनी गंभीर आरोप करत सांगितले की, दर्शनासाठी येणाऱ्यांकडून प्रति व्यक्ती ₹१० देणगी पावती सक्तीने घेतली जात आहे. देणगी ही स्वेच्छेची असताना ती जबरदस्तीने आकारली जात असल्याची भावना भाविकांमध्ये निर्माण झाली आहे.



तसेच, मंदिर परिसरात भाविकांना आंघोळीसाठी उपलब्ध करून दिलेल्या पाण्याबाबतही धक्कादायक बाब समोर आली आहे. या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून पाणी दूषित असल्याची तक्रार भाविकांनी केली आहे. पाण्यामध्ये प्लास्टिकचे तुकडे, खराब झालेले कपडे आणि कचरा आढळत असल्याचे भाविकांनी निदर्शनास आणून दिले आहे. अशा अस्वच्छ पाण्याचा वापर करणे आरोग्यास धोकादायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

भाविकांचे म्हणणे आहे की, मंदिर ट्रस्टने स्वच्छतेकडे तातडीने लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवावा, आंघोळीच्या पाण्याची योग्य तपासणी करून स्वच्छ पाणी उपलब्ध करावे, तसेच देणगी प्रक्रियेबाबत पारदर्शकता राखावी. संबंधित प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


श्रद्धेच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व सन्मानपूर्वक वातावरण मिळणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि मंदिर ट्रस्टने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई