प्रतिनिधी निफाड
निफाड (प्रतिनिधी):निफाड शहरातील एका महिलेला व्यवसायासाठी घेतलेले कर्ज आणि त्यावरील अव्वाच्या सव्वा व्याजाच्या वसुलीसाठी धमकावणाऱ्या आणि अश्लील शिवीगाळ करणाऱ्या सावकाराविरुद्ध निफाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मूळ रकमेपेक्षा जास्त पैसे देऊनही घरासमोर येऊन राडा घालणाऱ्या या संशयित सावकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, सावकारी कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदार अर्चना सुनील खरात (वय ३६, रा. गायत्री नगर, निफाड) यांचा साडी विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायातील अडचणींमुळे त्यांनी संशयित आरोपी भाऊसाहेब पंडित बोरगुडे (रा. नैताळे, ता. निफाड) याच्याकडून वेळोवेळी व्याजाने पैसे घेतले होते. ऑक्टोबर २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत तक्रारदाराने संशयिताकडून एकूण १० लाख ८२ हजार रुपये व्याजाने घेतले होते.

सदर तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आतापर्यंत संशयिताला मुद्दल आणि व्याजापोटी एकूण १२ लाख ८४ हजार रुपये परत केले आहेत. मात्र, तरीही संशयित बोरगुडे हा आणखी १० लाख रुपयांची मागणी करत होता. इतकेच नव्हे तर, पैसे न दिल्यास “तुला व तुझ्या पतीला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी त्याने दिली.
तसेच २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास संशयित आरोपीने फिर्यादीच्या घरासमोर येऊन मोठ्याने ओरडून अश्लील शिवीगाळ केली. “माझे पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या पतीला इथून उचलून नेईल,” अशा शब्दात त्याने धमकावले. या सततच्या जाचामुळे आणि दहशतीमुळे अखेर अर्चना खरात यांनी पोलिसांत धाव घेतली.
या तक्रारीवरून निफाड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०८, ३५१(२), ३५२ तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम ३९, ४५ व ४८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे असून निफाड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तपास अधिकारी: पोलीस निरीक्षक गणेश चंद्रभान पाडोळ निफाड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
अशा प्रकारे बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. नागरिकांनी कोणाच्याही सावकारी जाचाला बळी पडू नये आणि अशा घटना घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





