प्रतिनिधी: दत्तात्रय घुले (धामोरी)
फलटण :येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या “रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या” वतीने नुकतेच एका विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. येथील”श्रीमंत शिवाजीराजे कृषी उद्यान महाविद्यालयातील” विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आजच्या धावपळीच्या युगात तरुणांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे, यावर या मोहिमेत भर देण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर (हॉर्टिकल्चर)आणि जीवन शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदलती जीवनशैली आणि उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या यावर त्यांनी मोलाचा सल्ला देऊन, सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन केले.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी रणरागिणी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रझिया शेख यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी संस्थेचे सचिव मारुतीराव टकले, खजिनदार श्री. कैफ शेख, श्री. राज चांदवडकर, संचालिका तथा मुख्याध्यापिका सौ. शाहीन शेख, सौ. मायाताई बनसोडे, सौ. प्रीती शहा आणि सौ. अनिसा सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृषी महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेत आपली प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेतली. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकवृंद आणि संस्थेच्या वतीने आभार प्रदर्शन करण्यात आले.
“विद्यार्थी दशेतच आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होणे काळाची गरज आहे. रणरागिणी संस्थेचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.”
डॉ. एस. डी. निंबाळकर (प्राचार्य, श्रीमंत शिवाजीराजे कृषी उद्यान महाविद्यालय)
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





