नाशिक | विशेष प्रतिनिधी
नाशिक:ज्या धर्माच्या नावावर लोक श्रद्धेने डोके टेकवतात, तिथेच एका असहाय महिलेच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तिला वासनेचा शिकार बनवल्याचा संतापजनक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. कौटुंबिक कलह आणि मानसिक त्रासातून सुटका मिळवण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय विवाहितेवर एका ‘भोंदू बाबा’ने अत्याचार केल्याची धक्कादायक हकीकत समोर आली आहे.

नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या फिर्यादी महिलेचे वैवाहिक जीवन अस्थिर होते. दोन लग्ने मोडल्यानंतर तिसऱ्या लग्नाच्या तयारीत असताना तिला सतत मानसिक त्रास जाणवत होता. घरातील वादांमुळे तिला कुणीतरी ‘करणी-बाधा’ किंवा ‘भुटकी’ केल्याचा संशय होता. याच अंधश्रद्धेतून तिचे कुटुंब तिला निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील एका मंदिरात घेऊन गेले.
या ठिकाणी असलेल्या महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याने महिलेच्या पालकांना विश्वासात घेतले. “तुझ्यावर बाहेरची बाधा आहे,” असे सांगून त्याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. सुरुवातीला त्याने महिलेचा मोबाईल नंबर मिळवून तिला खासगी मेसेज करण्यास सुरुवात केली. “तू जेवलीस का?”, “तुला कसं वाटतंय?” अशा मेसेजमधून त्याने तिला जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

२३ ऑगस्ट २०२४ रोजी, या भोंदू बाबाने फिर्यादी महिलेला नाशिकमधील पंचवटी परिसरात भेटायला बोलावले. तिथून त्याने तिला एका लॉजवर नेले. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने आपल्या गळ्यातील रुद्राक्ष मणी दाखवून “माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तू काहीच करू शकणार नाहीस,” अशी भीती घातली. तिथे त्याने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे आक्षेपार्ह फोटोही काढले.
या घटनेनंतर पीडितेने आपल्या होणाऱ्या पतीला हा सर्व प्रकार सांगितला. मात्र, पुन्हा काही दिवसांनी संधी साधून या भोंदू बाबाने पीडितेचे सर्व मेसेज डिलीट केले आणि “मी गुंड आहे, माझे मोठे लोक ओळखीचे आहेत,” अशी धमकी देऊन तिला शांत राहण्यास भाग पाडले.
अखेर या त्रासाला कंटाळून आणि या भोंदूगिरीचा पर्दाफाश करण्यासाठी पीडितेने धाडस एकवटले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शनाखाली तिने नाशिक पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.
कौटुंबिक किंवा मानसिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार घेऊ नका. अशा भोंदू बाबांपासून सावध राहा आणि आपली फसवणूक किंवा छळ झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





