best news portal development company in india

सिन्नरच्या राजकारणात ‘आप’ची मोठी गर्जना; तालुकाध्यक्षपदी लढाऊ नेतृत्व शरद शिंदे पाटील यांची नियुक्ती..!

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर:राजकीय चिखलफेक आणि प्रस्थापित नेत्यांच्या दबावामुळे सिन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आम आदमी पार्टीने तालुक्यात आपले संघटन मजबूत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. देशातील प्रामाणिक नेतृत्व आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, सामाजिक कार्यकर्ते शरद शिंदे पाटील यांची आम आदमी पार्टीच्या सिन्नर तालुकाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.
ही निवड आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव निभावणे यांनी वरिष्ठ आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून ही नियुक्ती जाहीर केली. शरद शिंदे पाटील यांच्या निवडीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सिन्नर तालुक्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर यावेळेस सडकून टीका करण्यात आली. तालुक्यातील विरोध याक, सत्ताधारी आमदार माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्यावर निशाणा साधताना सांगण्यात आले की, या नेत्यांचे जिल्हा आणि राज्य पातळीवरील ‘सुमधूर’ संबंधांमुळे नवीन नेतृत्वाला काम करण्यास वाव मिळत नाही. अनेक पक्ष असूनही ते नेत्यांच्या मर्जीनुसार चालत असल्याने जनतेचे प्रश्न वाऱ्यावर आहेत. या गचाळ राजकारणाला कंटाळून आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी शरद शिंदे पाटील यांनी ‘आप’ची कास धरली आहे.
   सिन्नर तालुक्यातील शरद शिंदे पाटील हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सिन्नरमधील शेतकरी, कामगार आणि गोरगरीब जनतेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत. यापूर्वीही त्यांनी ‘आप’च्या माध्यमातून काम केले असून, अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील शपथविधी सोहळ्यालाही ते उपस्थित होते. सुमारे दीड वर्ष विचारविनिमय केल्यानंतर, नीतिमत्तेचे राजकारण आणि समाजकारण करण्यासाठी त्यांनी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला आहे.
या नियुक्तीनंतर बोलताना सांगण्यात आले की, आता सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावात आम आदमी पार्टी पोहोचवली जाईल. आगामी निवडणुका केवळ लढवण्यासाठीच नाही, तर जिंकण्याच्या निर्धाराने लढल्या जातील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्हाध्यक्ष निभावणे आणि इतर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी या लढाईत पूर्ण ताकदीने साथ देण्याचे आश्वासन शिंदे पाटील यांना दिले आहे.
“सिन्नरमधील गोरगरीब जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आणि राजकीय बदल घडवण्यासाठी आम्ही अरविंद केजरीवाल साहेबांचे नेतृत्व स्वीकारले आहे. आता तालुक्यात स्वच्छ आणि पारदर्शक राजकारणाची नवी पहाट होईल. असे नवनियुक्त आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांनी सांगितले.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई