प्रतिनिधी:दत्तात्रय घुले, धामोरी
येवला:तालुक्यातील अनकुटे येथील रहिवासी, प्रगतशील शेतकरी आणि मनमिळावू स्वभावामुळे सर्वांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारे स्व. देवराम सखाहारी तळेकर (वय ९२) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

स्व. तळेकर यांनी आयुष्यभर शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करत प्रगत शेतीची वाट धरली होती. कष्टाळू वृत्ती, साधेपणा आणि गावकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ते परिसरात आदराचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात. त्यांच्या जाण्याने अनकुटे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. धामोरी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच जय बाबाजी भक्त परिवाराचे माजी जिल्हा सेवक श्रावणजी तळेकर यांचे ते चुलते होत.
स्व. देवराम तळेकर यांच्या निधनाने तळेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




