best news portal development company in india

धामोरीत मद्यधुंद ‘रोडरोमिओंचा’ धुमाकूळ; छेडछाडीच्या प्रकारामुळे महिला व नागरिक भयभीत…प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी…

SHARE:

प्रतिनिधी:दत्तात्रय घुले,धामोरी
ग्रामीण भागात शहरीकरणाचा वेग वाढत असतानाच, दुसरीकडे तरुणाईमध्ये व्यसनाधीनता आणि सोशल मीडियाचा चुकीचा प्रभाव चिंतेचा विषय ठरत आहे. राहुरी तालुक्यातील धामोरी परिसरात सध्या मद्यधुंद रोडरोमिओंचा सुळसुळाट वाढला असून, यामुळे शालेय विद्यार्थिनी, महिला आणि स्थानिक व्यावसायिक प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत.
आजकाल खेडोपाडी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘काहीतरी वेगळे’ करून दाखवण्याच्या नादात तरुण पिढी घातक मार्गाला लागली आहे. वयात येतानाच अनेक युवक मद्यपान आणि इतर नशेच्या आहारी जात असल्याचे चित्र धामोरीत दिसत आहे. नशेच्या अंमलाखाली हे तरुण शाळा, महाविद्यालये, बाजारतळे, बसस्थानक आणि रिक्षा स्टँड यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी उभे राहून महिला व युवतींची छेड काढत आहेत. हे प्रकार आता सामाजिक समस्या बनू लागले असून, वेळीच पायबंद न घातल्यास गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धामोरी हे गाव परिसरातील ७ ते ८ गावांना जोडणारे मुख्य केंद्र आहे. येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, शाळा सुटण्याच्या वेळी किंवा गर्दीच्या ठिकाणी हे रोडरोमिओ टोळक्याने उभे राहून धिंगाणा घालतात. यामुळे व्यावसायिक त्रस्त:दुकानांसमोर उभे राहणाऱ्या या मद्यपींमुळे ग्राहकांना येणे कठीण झाले असून दुकानदार मेटाकुटीस आले आहेत.
छेडछाडीच्या प्रकारांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून मुलींना शाळेत पाठवताना भीती वाटत आहे.पोलीस दरबारी चकरा मारायला नकोत किंवा मद्यपींच्या त्रासाला घाबरून सामान्य नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत, ज्याचा फायदा हे रोडरोमिओ घेत आहेत.
धामोरीतील महिला बचत गट, युवक, प्रतिष्ठित नागरिक आणि व्यावसायिकांनी या त्रासाविरुद्ध आता आवाज उठवला आहे. गावचे पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मद्यधुंद रोडरोमिओंचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.”गावातील शांतता आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी गस्त वाढवणे गरजेचे आहे. या रोडरोमिओंचा बंदोबस्त न झाल्यास जनआंदोलन छेडले जाईल.

ग्रामस्थ व महिला प्रतिनिधी, धामोरी.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई