best news portal development company in india

शेतकऱ्याच्या लेकीची ‘एमपीएससी’त उत्तुंग भरारी! कोपरगावची कन्या स्नेहल आहेर हिची ‘कर सहाय्यक’ पदी निवड…

SHARE:

प्रतिनिधी: निवृत्ती पगार ,कोळपेवाडी

प्रतिनिधी: निवृत्ती पगार ,कोळपेवाडी
   कोपरगांव:जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलेही गगनभरारी घेऊ शकतात, याचा प्रत्यय कोपरगाव तालुक्यातील येसगावच्या कन्येने दिला आहे. येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कन्या स्नेहल अशोक आहेर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश मिळवत ‘कर सहाय्यक’ (Tax Assistant)पदाला गवसणी घातली आहे.

स्नेहलच्या या यशाने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्नेहलने तिचे एम.एससी. मायक्रोबायोलॉजी (M.Sc. Microbiology) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. घरची परिस्थिती बेताची, वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, परिस्थितीचे कोणतेही भांडवल न करता स्नेहलने अभ्यासात सातत्य ठेवले. कोपरगाव येथील नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातील अभ्यासिकेत तिने तासनतास मेहनत घेतली. वाचनालयातील शांत वातावरण आणि स्वतःची जिद्द यांच्या जोरावर तिने हे यश संपादन करून ‘कर सहाय्यक’ पदापर्यंत मजल मारली आहे.
स्नेहलच्या या यशाची माहिती मिळताच तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे विशेष अभिनंदन केले. कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान, युवा नेते विवेक कोल्हे तसेच माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी स्नेहलचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलीने जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
स्नेहलच्या यशाने केवळ आहेर कुटुंबाचीच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाची मानही उंचावली आहे. प्रतिकूल परिस्थितीला हार न मानता तिने आपल्या कष्टाचा ठसा उमटवला आहे. जिद्द आणि सातत्य असेल तर स्वप्ने नक्कीच पूर्ण होतात, याचा स्नेहल जिवंत आदर्श ठरली आहे.
सध्या सोशल मीडियासह संपूर्ण कोपरगाव परिसरात स्नेहलच्या या यशाचे मोठे कौतुक होत असून, “शेतकऱ्याची लेक अधिकारी झाली” या अभिमानाने गावकऱ्यांचे चेहरे फुलले आहेत.

सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्यूज महाराष्ट्र “संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड,उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क:- 9422952513 / 9637100608
प्रतिनिधी: निवृत्ती पगार
एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई