प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
दि. 9 एप्रिल 2026
सिन्नर:घरफोडी, मोटारसायकल चोरी, चैन-मंगळसूत्र चोऱ्या तसेच दरोडेखोरांच्या वाढत्या घटनांवर प्रभावी आळा घालण्यासाठी सिन्नर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद व मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले. “सुरक्षित सिन्नर — आपली जबाबदारी” हा संदेश देत नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले.
या सभेत पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे व त्यांच्या पथकाने नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात काही साध्या पण परिणामकारक सवयी अंगीकारल्यास गुन्हे मोठ्या प्रमाणात रोखता येऊ शकतात, यावर त्यांनी भर दिला. या वेळी
नागरिकांसाठी पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या असून
1. घर बंद करून बाहेर जाताना दरवाजाला इंटर लॉक असणे अत्यावश्यक.2. इमारत/सोसायटीत येणाऱ्या नवीन व्यक्तीकडे कोणाकडे आले, नाव-गाव याची चौकशी करावी.3. बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना पूर्वकल्पना द्यावी.4. महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जास्त दागिने परिधान टाळावेत.5. सोसायटी व परिसरातील सर्वांशी ओळख ठेवावी; संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तत्काळ विचारपूस करावी.
6. नागरी सुरक्षा दलात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी पोलीस स्टेशनमध्ये नोंदणी करावी.7. “आपली व आपल्या परिसराची सुरक्षा आपणच” या भावनेतून नागरिकांनी पुढे यावे.
पोलिसांनी स्पष्ट केले की, गुन्हे रोखण्यासाठी केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. परिसरात परस्पर संपर्क, सतर्कता आणि त्वरित माहिती देण्याची सवय लागल्यास गुन्हेगारांना संधीच मिळणार नाही.
या जनजागृती उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुरक्षित, सजग आणि संघटित सिन्नर घडवण्यासाठी पोलिस व नागरिक यांचा समन्वयच निर्णायक ठरणार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.


“एवन न्युज महाराष्ट्र“
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





