best news portal development company in india

धामोरी नगरीत भक्तिचा जागर! श्री कालभैरवनाथ व वेताळ महाराज यात्रोत्सवास भव्य प्रारंभ; विद्युत रोषणाईने परिसर उजळला…

SHARE:

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी” एवन न्यूज महाराष्ट्रसंपादक अरुण चंद्रभान गायकवाड,९७६६८०२५१३/ उपसंपादक ज्ञानेश्वर यशवंत सांगळे ९६३७१००६०८

प्रतिनिधी: दत्तात्रय घुले: धामोरी
कोपरगाव: तालुक्यातील अध्यात्मिक केंद्र असलेल्या श्रीक्षेत्र धामोरी येथे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ महाराज आणि वेताळ महाराज यांचा यात्रामहोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक थाटामाटात साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त संपूर्ण धामोरी नगरी सजली असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विद्युत रोषणाईने मंदिरांचे रूप पालटले.


यात्रोत्सवाचे औचित्य साधून श्री कालभैरवनाथ मंदिर, श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि गावातील मुख्य प्रवेशद्वार (वेस कमान) येथे अत्यंत नयनरम्य आणि भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी झगमगाटाने न्हाऊन निघालेली ही मंदिरे भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.
    परंपरेनुसार, यात्रोत्सव काळात श्री कालभैरवनाथ मंदिरात नऊ दिवसांचे घट बसविले जातात. यावर्षी घट स्थापनेचा आणि पूजेचा बहुमान भाकरे कुटुंबातील श्री. तुकाराम सकाहारी भाकरे आणि श्री. सचिन जयराम भाकरे यांना मिळाला आहे.
भाविकांच्या मनोरंजनासाठी देवस्थान कमिटीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, ३१ मार्च २०२६: लोकनाट्य तमाशा (पहिला दिवस)
  बुधवार, १ एप्रिल २०२६: लोकनाट्य तमाशा (दुसरा दिवस)
“धामोरी येथील हा यात्रोत्सव गावच्या एकतेचे प्रतीक आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा आणि मनोरंजनाचा लाभ घ्यावा.”असे आवाहन श्री. विलासराव भाकरे (चेअरमन, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांनी केले.


या यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतिशराव भाकरे, उपाध्यक्ष दत्तात्रय पगार, शिवाजीराव वाघ, विलासअप्पा माळी, संपतराव भाकरे, राहुलजी वाणी तसेच मंदिर पुजारी निवृत्ती शिंदे, लाईट सिस्टिमचे ज्ञानेश्वर शिंदे (माऊली) आणि समस्त ग्रामस्थ अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई