
प्रतिनिधी: “एवन न्यूज महाराष्ट्र” ,चांदवड
चांदवड:तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि आक्रमक कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण करणारे श्री. गणेशजी निंबाळकर यांच्या कामाची मोठी ‘पोचपावती’ आज पाहायला मिळत आहे. निंबाळकर यांनी जनहितासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मांडलेला प्रत्येक मुद्दा थेट राज्य मंत्रिमंडळात चर्चेला जात असल्याने, चांदवड तालुक्याचा आवाज आता मंत्रालयापर्यंत घुमू लागला आहे.

सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले गणेशजी निंबाळकर यांनी केवळ घोषणाबाजी न करता, वस्तुस्थितीला धरून प्रश्नांची मांडणी केली आहे. त्यांनी मांडलेल्या विषयांची दखल खुद्द मंत्रिमंडळाला घ्यावी लागणे, ही त्यांच्या अभ्यासू नेतृत्वाची मोठी पावती मानली जात आहे. शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नापासून ते पायाभूत सुविधांपर्यंतच्या प्रत्येक मुद्द्यावर निंबाळकर यांनी दिलेला लढा आता फळाला येत असल्याचे चित्र आहे.

“चांदवड तालुक्याला खऱ्या अर्थाने एका अशा नेत्याची गरज होती जो मातीतील प्रश्न ओळखतो. गणेशजींच्या रूपाने तालुक्याला एक खंबीर शेतकरी पुत्र आणि निस्पृह शेतकरी नेता मिळाला आहे,” अशा भावना तालुक्यातील नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. निंबाळकर यांच्या कामाचा वेग आणि प्रश्नांची तड लावणारी वृत्ती पाहता, चांदवड तालुक्याची धुरा ही निंबाळकरांच्याच हाती सुरक्षित आणि योग्य आहे, यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.
आपल्या नेत्याने मांडलेले प्रश्न जेव्हा मंत्रिमंडळ स्तरावर चर्चेला येतात, तेव्हा तो संपूर्ण तालुक्याचा सन्मान असतो. यामुळे चांदवड तालुक्यातील युवक आणि शेतकरी वर्गामध्ये प्रचंड उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चांदवड तालुका विकासाची नवी शिखरे सर करेल, असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे.


Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





