best news portal development company in india

सिन्नर तालुक्यात पोटनिवडणुकीचे बिगुल! वडगाव पिंगळा, मोहू आणि शहा ग्रामपंचायतींमध्ये राजकीय रणधुमाळी सुरू…

SHARE:

संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड, उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे ९४२२९५२५१३/९६३७१००६०८


प्रतिनिधी: भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर
सिन्नर :तालुक्यातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायत जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून तालुक्यातील वडगाव पिंगळा, मोहू आणि शहा या तीन महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी ही निवडणूक होत आहे, प्रशासकीय नोटीस प्रसिद्ध होताच ग्रामीण भागात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला याचे चित्र दिसत आहे.
पंचायत समिती कार्यालय सिन्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांवर ही निवडणूक होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
वडगाव पिंगळा: येथील प्रभाग क्रमांक ३ मधील सदस्य श्री. जगन खंडेराव भिमाजी आणि थेट निवडून आलेल्या सरपंच सौ. शेवंताबाई मुठाळ यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत.
मोहू: या ग्रामपंचायतीमधील प्रभाग १, २ आणि ३ मधील सदस्यांना अतिक्रमण केसमध्ये अप्पर आयुक्तांच्या आदेशान्वये अपात्र ठरवण्यात आल्याने या जागांवर निवडणूक होत आहे.
शहा: प्रभाग क्रमांक ३ मधील श्री. आप्पा गोधडे (अनुसूचित जमाती पुरुष प्रवर्ग) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.


निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम हा तहसीलदार सिन्नर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीर सूचनेनुसार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे, नमुना ‘(अ अ’),  नुसार निवडणुकीचे टप्पे दिले आहे.या मध्ये दिनांक आणि वेळ निश्चित केले असून,,,,
दिनांक आणि वेळ पुढील प्रमाणे असे की ,नामनिर्देशन पत्र (अर्ज) भरणे ७ एप्रिल २०२६ ते १३ एप्रिल २०२६ (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत) छाननी (Scrutiny) १५ एप्रिल २०२६ (सकाळी ११ वाजता) अर्ज मागे घेण्याची मुदत १७ एप्रिल २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत) मतदानाचा दिनांक २८ एप्रिल २०२६ (मंगळवार)
मतदानाची वेळ सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत.
या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. निखिल शिरोडे (मंडळ अधिकारी, शहा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्रे स्वीकारणे आणि छाननीची प्रक्रिया सिन्नर तहसील कार्यालयात पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.
   शहा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या जागेसाठी विशेष लक्ष लागले असून. आपल्या गटाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी स्थानिक नेत्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रखडलेली विकासकामे आणि स्थानिक प्रश्न या निवडणुकीत कळीचे ठरणार असून, २८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सत्य वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्यूज महाराष्ट्र”

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
“एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई