प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर, दि. 25 फेब्रुवारी 2026 (प्रतिनिधी) – तालुक्यातील मंदिरांमध्ये सुरू असलेल्या चोरीच्या मालिकेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यात शहा-कारवाडी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र, शहा-कारवाडी येथे चोरट्यांनी डल्ला मारत चांदीच्या वस्तू व महागडा ऐवज लंपास केला होता. त्या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वावी पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताला जेरबंद करण्यात यश मिळवले होते. मात्र त्यानंतरही चोरट्यांची शिरजोरी कायम असल्याचे दिसून येत आहे.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील प्रसिद्ध शनेश्वर महादेव मंदिरात सोमवारी (दि. 23 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दानपेटी फोडून सुमारे 40 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रात्री 8 ते पहाटे 6 वाजेच्या दरम्यान घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मंदिराचे पुजारी प्रमोद बाळासाहेब गडाख (वय 30, रा. पाथरी खुर्द, ता. सिन्नर) हे सकाळी पूजा करण्यासाठी मंदिरात आले असता दरवाजाचे तुटलेले कुलूप, दानपेटीची तोडफोड व अस्ताव्यस्त पडलेले साहित्य पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 305 व 311(4) अन्वये गुन्हा क्रमांक 53/2026 दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी कोळपे पुढील तपास करत आहेत.
अल्पावधीतच मंदिरांवर सलग चोरीच्या घटना घडत असल्याने ग्रामीण भागातील भाविक व ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
— Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





