best news portal development company in india

पंचवटीतील रामकुंडवर अजूनही प्रतीक्षेतच अहिल्यादेवी होळकर स्मारक…
शिवजयंती सोहळ्यात पुन्हा मागणीचा जोर; कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा – अमरजीत दादा बारगळ

SHARE:



प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे सिन्नर

नाशिक:नाशिकमध्ये अलीकडेच मोठ्या उत्साहात पार पडलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात ऐतिहासिक वारशाच्या जतनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पंचवटीतील रामकुंड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी यावेळी ठळकपणे पुढे आली. होळकर राजघराण्याचे व विविध सरदार घराण्यांचे वंशज उपस्थित असताना या विषयावर ठाम भूमिका मांडण्यात आली.
तळोदा संस्थानचे जाहगीरदार श्रीमंत अमरजीत दादा बारगळ यांनी आपल्या भाषणात अहिल्यादेवी होळकर यांच्या धर्मरक्षण, धर्मजागृती आणि धर्मप्रसाराच्या कार्याचा उल्लेख करत पंचवटी येथे त्यांच्या स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. “अहिल्यादेवींचे कार्य जागतिक पातळीवर मान्य झाले आहे. पंचवटीसारख्या पवित्र स्थळी त्यांचे स्मारक उभारणे ही ऐतिहासिक व सांस्कृतिक जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
‘हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती, नाशिक’च्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, जन्मोत्सव व पुण्यतिथी सोहळ्यांद्वारे स्मारकासाठी जनजागृती केली जात आहे. समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल यांनी सांगितले की, राज्यातील अनेक मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना निवेदने देऊनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.
या संदर्भात राज्यातील विविध मान्यवरांना यापूर्वी निवेदने सादर करण्यात आली असून, कुंभपर्वाच्या वर्षात मिळणाऱ्या विकासनिधीतून हे स्मारक उभारणे शक्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. पंचवटीतील रामकुंड परिसरात ‘अहिल्यासृष्टी’ उभारण्याची संकल्पनाही समितीने मांडली आहे.
यंदाचे वर्ष कुंभपर्वाचे असल्याने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे प्रस्तावित आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवींचे स्मारक प्राधान्याने उभारल्यास धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल आणि ऐतिहासिक वारशाचे जतनही होईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.
पंचवटीतील रामकुंडावर अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे, ही नाशिककरांची दीर्घकालीन इच्छा असून शासनाने इच्छाशक्ती दाखवून तातडीने कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
आता कुंभपर्वाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या नाशिकमध्ये, ऐतिहासिक वारशाच्या या मागणीला शासन किती लवकर प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई