best news portal development company in india

लासलगाव बाजार समितीत कांद्यावरून तणाव…
शेतकऱ्यांचा संताप उसळला; गणेश भाऊ निंबाळकर यांच्या हस्तक्षेपाने दर पुन्हा वाढले…

SHARE:

Aone News Maharashtra | प्रतिनिधी–नाशिक

नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेचे हृदय मानल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज कांद्याच्या दरावरून मोठा गोंधळ निर्माण झाला. केंद्राच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप आज उफाळून आला आणि बाजार समिती काही काळासाठी बंद पाडण्यात आली.

आज सकाळी लिलावास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या पाच लाईनपर्यंत कांद्याला ६०० ते ८०० रुपये दर मिळत होते. उच्चांकी दर म्हणून फक्त एका नगाला १४०० रुपये भाव मिळाला. व्यापाऱ्यांची ‘खेळी’ असल्याचा संशय व्यक्त करत शेतकऱ्यांनी संतापाच्या भरात बाजार समिती बंद पाडली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलीस प्रशासन, बाजार समिती प्रशासन आणि माध्यम प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, ही माहिती मिळताच शेतकरी पुत्र म्हणून ओळखले जाणारे गणेश भाऊ निंबाळकर तात्काळ बाजार समितीत दाखल झाले. त्यांनी शेतकरी व व्यापारी यांच्याशी संवाद साधून तातडीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
लिलाव बंद होण्यापूर्वी शेवटच्या दोन ट्रॅक्टरपैकी एक ट्रॅक्टर ६०० रुपयांनी विकला गेला होता. मात्र, निंबाळकर यांच्या मध्यस्थीनंतर लिलाव पुन्हा सुरू झाल्यावर त्याच ट्रॅक्टरला ९१२ रुपये दर मिळाला. त्यानंतर अनेक ट्रॅक्टर १००० रुपयांपेक्षा जास्त दराने विकले गेल्याची माहिती मिळाली.


यावरून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दर पाडले जात असल्याचा आरोप केला. “जर व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना लुटायला सुरुवात केली, तर शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.
यावेळी गणेश भाऊ निंबाळकर यांनी आंदोलनाची दिशा बदलण्याचे आवाहन केले.

“बाजार समिती बंद पाडून किंवा रस्ता रोको करून प्रश्न सुटत नाही. आता आंदोलन करायचेच असेल तर मुख्य कमिशनर कार्यालयाला घेराव घालून, न्याय मिळेपर्यंत ते कार्यालय सोडायचे नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, “आजवर अनेकदा उपोषण, रस्ता रोको आंदोलने झाली; मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे आता थेट प्रशासनाला जबाबदार धरण्याची वेळ आली आहे.
कांद्याच्या घसरत्या दरामुळे नाशिकसह राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, येत्या काळात आंदोलनाची ठिणगी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी”एवन न्यूज महाराष्ट्र” या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा,कमेंट करा.

संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड,
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे,
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा: -9422952513/9637100608
आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की द्या
– Aone News Maharashtra

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई