best news portal development company in india

पतीचा जीव वाचवताना पत्नीचे बलिदान! सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडीतील हृदयद्रावक घटना….

SHARE:


प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर (जि. नाशिक) – सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. पतीला विजेचा जबर धक्का बसल्याचे डोळ्यासमोर पाहताच पत्नीने क्षणाचाही विलंब न लावता त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली; मात्र या प्रयत्नात स्वतःचा जीव गमावल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
शिंदेवाडी येथील शेतकरी दीपक खाडे हे गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. विद्युत मोटर सुरू करण्यासाठी त्यांनी स्टार्टरचे बटण दाबताच अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की ते मोटरला चिटकून राहिले.
ही संपूर्ण घटना त्यांच्या पत्नी सौ. छाया खाडे यांच्या डोळ्यासमोर घडत होती. पती संकटात असल्याचे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विचार न करता पतीला वाचवण्यासाठी धाव घेतली. विजेच्या प्रवाहापासून पतीला दूर करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनाही जोरदार विजेचा धक्का बसला.
या घटनेत छाया खाडे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर विजेच्या धक्क्याने दीपक खाडे बाजूला फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी दीपक खाडे यांना उपचारासाठी सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, छाया खाडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
शिंदेवाडीचे पोलीस पाटील शांताराम कोकाटे यांनी याबाबतची माहिती एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
पतीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या छाया खाडे यांच्या धाडसाने संपूर्ण गाव भावुक झाले आहे. एका क्षणात खाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शिंदेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना पुन्हा एकदा शेतीपंप व विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी ठरली आहे. ग्रामीण भागात वीजजोडणी व स्टार्टर यंत्रणांची नियमित तपासणी होणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आपल्या कुटुंबासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छाया खाडे यांच्या बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई