best news portal development company in india

धक्कादायक! मूल होत नसल्याच्या नैताश्यातून विवाहितेचे टोकाचे पाऊल; नाशिकमधील ‘स्पर्श’ हॉस्पिटलबाहेर खळबळ…

SHARE:

प्रतिनिधी:गोरख कसबे,गिरनारे
नाशिक: वैद्यकीय उपचार सुरू असताना डॉक्टरांनी दिलेल्या एका माहितीने एका तरुण विवाहितेच्या आयुष्यात खळबळ उडवून दिली. “तुला कधीच मूल होणार नाही,” हे शब्द सहन न झाल्याने नाशिकच्या ‘स्पर्श’ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या २७ वर्षीय अश्विनी पप्पू फडोल या विवाहितेने रुग्णालयातून बेपत्ता होऊन टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मयत महिला- अश्विनी फडोळ


त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे येथील माहेर असलेल्या अश्विनी यांचा विवाह सारोळे येथील पप्पू फडोल यांच्याशी झाला होता. लग्नाला चार वर्षे होऊनही अपत्य होत नसल्याने अश्विनी यांच्यावर नाशिकमधील ‘स्पर्श’ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांना तपासणी आणि सोनोग्राफीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नातेवाईकांच्या आरोपानुसार, सोनोग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी अश्विनी यांना थेट सांगितले की, “तुला मूलबाळ होऊ शकत नाही.” हा धक्का अश्विनी यांना सहन झाला नाही. त्यांनी प्रचंड नैराश्यात येऊन आपल्या पतीला आणि आईला सांगितले की, “मला आता कोणालाच तोंड दाखवायची इच्छा नाही.”
घटनेच्या दिवशी अश्विनी यांनी आपल्या आईला कपडे वाळत घालण्यासाठी पाठवले आणि पतीला जेवण करण्यासाठी बाहेर जाण्यास सांगितले. “मी मॅडमला भेटून येते,” असे सांगून त्या वार्डमधून बाहेर पडल्या. मात्र, बराच वेळ झाला तरी त्या परतल्या नाहीत. .सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या रुग्णालयाबाहेर जाताना दिसल्याचे समोर आले. पुढील शोधात त्यांचा मृतदेह गंगापूर धरण परिसरात आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांनी या गंभीर विषयात तत्परता दाखवली नाही, असा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. “रुग्णालय आणि पोलीस ठाणे यात केवळ एक हजार मीटरचे अंतर असूनही पोलिसांनी तातडीने तपास केला नाही. अखेर आम्ही स्वतः रिक्षाचालक आणि खासगी सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध घेण्याचा प्रयत्न केला,” असे संतप्त नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
रुग्णाची मानसिक स्थिती ओळखून त्यांना अशा संवेदनशील बातम्या कशा प्रकारे द्याव्यात, याबाबत रुग्णालयाने निष्काळजीपणा दाखवला का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

प्रतिनिधी:गोरख कसबे
एवन न्यूज महाराष्ट्र
गिरणारे(नाशिक)

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई