प्रतिनिधी:प्रकाश शिंदे,कोपरगाव
कोपरगाव:मौजे दहेगाव बोलका, ता.कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथे ग्रामपंचायतीकडून झालेल्या कथित अतिक्रमणाविरोधात नागरिक हवालदिल झाले असून प्रशासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध म्हणून टोकाच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. 16 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता पंचायत समिती कोपरगाव येथील माननीय गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर जाहीर आंदोलन करण्यात येणार आहे.
दहेगाव बोलका येथील सिटी सर्वे नं. 310 या गटामध्ये ग्रामपंचायत दहेगाव बोलका यांनीच अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अतिक्रमणामुळे संबंधित जागा असूनही तिचा उपयोग करता येत नसल्याने ग्रामस्थांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच विस्ताराधिकारी पंचायत समिती कोपरगाव यांना वेळोवेळी निवेदने देऊन आंदोलनही करण्यात आले; मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई न होता केवळ उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
या प्रकरणातील मुख्य तक्रारदार किशोर झुंबरबाई आसाराम मिसाळ (रा. दहेगाव बोलका, ता. कोपरगाव) यांनी आंदोलनादरम्यान आपली व्यथा व्यक्त करताना सांगितले की, “स्वतःची जागा असूनही ती खाली करून घेण्यासाठी एवढी उठाठेव करावी लागते. जीवन जगायलाच नको, अशी अवस्था झाली आहे.” प्रशासनाकडून “तुमच्या अर्जाला काही किंमत नाही” अशी भूमिका घेतली जात असल्याने आपण पूर्णतः हतबल झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
याच निषेधार्थ, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माननीय गटविकास अधिकारी व विस्ताराधिकारी यांच्या कार्यालयासमोर बुटा-चपलाने स्वतःचे तोंड झोडण्याचा टोकाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ (माहेगाव देशमुख, ता. कोपरगाव) तसेच प्रकाश शिंदे (कारवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
आंदोलकांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने चौकशी करून अतिक्रमण हटवावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





