best news portal development company in india

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त निफाड येथे पत्रकारांचा सन्मान; समाजप्रबोधनाची मशाल पुन्हा तेजस्वी

SHARE:


निफाड | प्रतिनिधी
निफाड:मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जय हिंद लोकचळवळ, निफाडच्या वतीने सन २०२६–२७ या कालावधीत पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय, निर्भीड व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गुणगौरव सोहळा निफाड येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सत्य, निर्भयता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणारा हा सोहळा पत्रकारितेच्या आदर्श परंपरेला उजाळा देणारा ठरला.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन जय हिंद लोकचळवळचे समन्वयक मा. श्री. सचिन भाऊ खडताळे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आमदार मा. सत्यजित दादा तांबे यांच्या शुभहस्ते पत्रकारांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा मा. श्रीमती रत्नमालाताई कापसे, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार, माजी नगराध्यक्षा सौ. शारदाताई, निफाड नगरपंचायतीचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. निफाड ग्रामस्थांसह निफाड नगरीतील सर्व पत्रकार बांधवांनी या सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजजागृती, सुधारणावादी विचार आणि सत्याचा आग्रह जपण्याचे केलेले कार्य अधोरेखित केले. आजच्या डिजिटल युगातही पत्रकारांनी सत्य, नैतिकता व सामाजिक बांधिलकी जपून काम करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अधिक जबाबदार असून समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांचा आवाज बनणे हीच खरी पत्रकारिता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या गुणगौरव सोहळ्यामुळे पत्रकारांच्या कार्याला नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली असून समाजहितासाठी निर्भीड, प्रामाणिक व लोकाभिमुख पत्रकारिता करण्याचा संकल्प या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला. कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

ज्ञानेश्वर(नाना) सांगळे
एवन न्यूज महाराष्ट्र
नाशिक
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई