
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १०० मध्ये मोठ्या राजकीय रंगतदार लढतीनंतर भाजपच्या उमेदवार दिपाली गणेश गीते, रूपाली ननावरे आणि रंजनाताई भानशी या तिघी दणदणीत मताधिक्याने निवडून आल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे प्रवीण जाधव यांनीही या प्रभागातून विजय मिळवत आपली राजकीय पकड सिद्ध केली आहे.

निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. दिपालीताई गीते यांच्या विजयाच्या आनंदात शहरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल-ताशे आणि डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरत विजयाचा आनंद व्यक्त केला. संपूर्ण परिसर भाजपच्या झेंड्यांनी सजला होता.
या जल्लोषाच्या वेळी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोकुळ भाऊ गीते यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच ओझरचे यतीन भाऊ कदम आणि ओझरचे नागराधक्ष सतीश भाऊ मोरे यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले व सर्व मतदारांचे आभार मानले.
विजयानंतर बोलताना दिपालीताई गणेश गीते म्हणाल्या,
“हा विजय जनतेचा आहे. प्रभाग १ चा सर्वांगीण विकास केल्याशिवाय मी थांबणार नाही. नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी कामातून सार्थ ठरवेन.”
या निकालामुळे प्रभाग १ मध्ये भाजपची ताकद अधिक वाढली असून आगामी विकासकामांना गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





