best news portal development company in india

शिवडे शिवारात बिबट्याचा हल्ला : शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू, काही तासांतच बिबट्याचाही अंत…

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

सिन्नर : तालुक्यातील शिवडे शिवारात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोरख जाधव असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गहू पिकाला पाणी भरल्यानंतर शेतकरी गोरख जाधव हे विहिरीच्या कठड्यावर बसून जेवण करत असताना अचानक बिबट्याने झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यासह बिबट्या थेट विहिरीत कोसळला. या घटनेत शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, या घटनेची सुरुवातीला अधिकृत पुष्टी मिळालेली नव्हती.
घटनेनंतर वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढले, मात्र सायंकाळपर्यंत बिबट्याचाही मृत्यू झाला, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे काही तासांतच शेतकरी व बिबट्या दोघांचाही दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेपूर्वीच बिबट्याने विहिरीपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर आणखी एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. पंचाळे गावात ११ वर्षीय सारंग थोरात याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, तर खडांगळी शिवारात ६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच शिवडे येथील ही दुर्घटना घडली आहे.
    या पार्श्वभूमीवर शिवडे गावासह पांडुर्ली, सावता माळीनगर, बोरखंड या परिसरात प्रचंड तणाव, भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन वातावरण शांत केले.
सतत होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, वनविभागाने तातडीने बिबट्यांना जेरबंद करावे, पिंजरे लावावेत व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई