प्रतिनिधी:प्रकाश शिंदे,कोपरगाव
—————————————————————
कोपरगाव:तालुका कोपरगावमधील दहेगाव बोलका येथे न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही शेतकऱ्याच्या बांधावर वारंवार अतिक्रमण व त्रास दिला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अन्यायाविरोधात सामाजिक कार्यकर्ते किशोर झुंबर बाई आसाराम मिसाळ (रा. दहेगाव बोलका, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) यांनी कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर जाहीर उपोषणाचा इशारा देत प्रत्यक्ष आंदोलन सुरू केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मौजे दहेगाव बोलका, गट नंबर २१४ येथील शेतकरी आपल्या स्वतःच्या शेतजमिनीत कायदेशीर हद्दीत शेती करत असताना, शेजारील शेतकरी रामदास लक्ष्मण काकड व शामराव लक्ष्मण बुट्टे (दोघे रा. दहेगाव बोलका) हे वारंवार शेताच्या बांधावर अतिक्रमण करून त्रास देत असल्याचा आरोप आहे.
या सततच्या त्रासापासून मुक्ती मिळावी आणि शेताच्या बांधाचे संरक्षण व्हावे, यासाठी संबंधित शेतकऱ्याने माननीय न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने स्पष्ट आदेश देत “बांधाला कोणताही त्रास देऊ नये, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल” असे निर्देश दिले होते.
असे असतानाही, न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासत सदर व्यक्तींकडून वारंवार बांधावर अतिक्रमण व नुकसान केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पीडित शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी किशोर मिसाळ यांनी कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यालयाबाहेर जाहीर उपोषण व आंदोलन सुरू केले. मात्र, आंदोलन करू नये यासाठी पोलीस कर्मचारी कायद्याचा धाक दाखवून दमदाटी करत असल्याचा गंभीर आरोप किशोर मिसाळ यांनी केला आहे.
यावेळी बोलताना किशोर मिसाळ म्हणाले,
“न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई होत नसेल, तर सर्वसामान्यांनी न्याय कुठे मागायचा? कायद्याचे रक्षकच जर कायद्याचे उल्लंघन पाहून डोळेझाक करत असतील, तर लोकशाहीला काय अर्थ उरतो?”
तसेच, पोलिसांवर राजकीय दबाव कमी झाल्यामुळे किंवा राजकीय हस्तक्षेपामुळेच कारवाई होत नसल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नसून, आंदोलनामुळे तालुका स्तरावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित प्रकरणात तात्काळ न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





