प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर
सिन्नर:कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सिन्नर तालुक्यातील वावी येथे आयोजित राज्यस्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळत आहे. तीन जानेवारीपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचा आज दुसरा दिवस असून सोमवार दिनांक ५ जानेवारी रोजी समारोप होणार आहे.
या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे तसेच कोपरगावचे भाजपचे ज्येष्ठ युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते पार पडले. उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी, पशुपालक, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नसला, तरी दुसऱ्या दिवशी मात्र शेतकऱ्यांची व नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. विविध देशी-विदेशी जातींची जनावरे, शेळ्या, मेंढ्या, कुक्कुट पक्षी यांचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आले आहे.
या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सिन्नर तालुक्यातील घोटेवाडी येथील शेतकऱ्यांच्या गाईला तब्बल १ लाख ११ हजार रुपयांचा उच्चांक दर मिळाला, तर केवळ पाच महिन्यांच्या छोट्या बकरीला ११ हजार रुपये दर मिळाल्याने पशुपालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना विवेक भैय्या कोल्हे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. पुढील वर्षी कोपरगाव व सिन्नर या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संयुक्त विद्यमाने याच ठिकाणी आणखी भव्य स्वरूपाचे पशुपक्षी प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेण्यात येईल. या प्रदर्शनाचा थेट फायदा शेतकऱ्यांना कसा होईल, यावर विशेष भर देण्यात येईल.
यावेळी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी विवेक कोल्हे यांनी मांडलेल्या संयुक्त प्रदर्शनाच्या संकल्पनेला सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती व संपूर्ण सिन्नर तालुक्याच्या वतीने संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
या प्रसंगी संजीवनी साखर कारखान्याच्या उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे, बाजार समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण घुमरे, उपाध्यक्ष सिंधुताई कोकाटे, भारत कोकाटे, बाळासाहेब वाघ, तसेच संचालक मंडळ, पशुपालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यस्तरीय पशुपक्षी प्रदर्शनामुळे पशुपालन व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांना आर्थिक संधी उपलब्ध होत असल्याचे चित्र असून, उर्वरित दिवसांत आणखी गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





