प्रतिनिधी किसन सोनवणे कारवाडी
कारवाडी:कोपरगाव तालुक्यातील कारवाडी गावात बस सेवेच्या गंभीर दुर्लक्षामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या येण्या-जाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. शासनाच्या “बेटी बचाव, बेटी पढाव” या महत्वाकांक्षी योजनेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार चिंताजनक असून प्रत्यक्षात मात्र या संकल्पनेची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
कारवाडी गावात एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व एक हायस्कूल असले तरी पुढील शिक्षणासाठी येथील मुली व मुले कोळपेवाडी व कोपरगाव येथे शिक्षणासाठी प्रवास करतात. कारवाडी हे गाव ग्रामीण भागात असून कोळपेवाडीपासून सुमारे ८ किलोमीटर, तर कोपरगावपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे.
पूर्वी कारवाडी येथे सकाळी ७ वाजता, साडेनऊ वाजता, दुपारी दीड वाजता व संध्याकाळी ७ वाजता नियमित बससेवा उपलब्ध होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुपारी दीड वाजताची बस येत नाही, सकाळची बस वेळेवर नसते आणि संध्याकाळची बस अंधार पडल्यानंतर येते, असे विदारक चित्र समोर आले आहे.
यामुळे अनेक वेळा बस कोळपेवाडी येथील शनी मंदिर परिसरातच विद्यार्थिनींना उतरवून निघून जाते, त्यानंतर मुलींना अर्धा ते एक किलोमीटर पायी चालावे लागते. बस चुकल्यास काही मुलींना कारवाडी फाटा येथे उतरून तब्बल तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो.

या मार्गावर वाहतूक नसलेला मोकळा परिसर, शेतजमीन व जंगलसदृश भाग असल्याने हिंसक प्राणी किंवा असामाजिक घटकांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत जर एखादी अनुचित घटना घडली, तर याला जबाबदार कोण? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय मंगेश भाऊ अवताडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष किसनराव सोनवणे यांनी प्रत्यक्ष कारवाडी येथे भेट देऊन चौकशी केली, असता ही संपूर्ण परिस्थिती उघडकीस आली.
एकलव्य संघटनेच्या वतीने कोपरगाव आगार प्रमुख, जिल्हा आगार प्रमुख व परिवहन मंडळ प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस, पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील व परिवहन मंत्री यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत, तर माननीय मंगेश भाऊ अवताडे, जिल्हाध्यक्ष किसन सोनवणे, प्रकाश शिंदे, मौलाना अफजल, बाळासाहेब घेगडमल, बलराज घेगडमल, बोला पवार व इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव परिवहन मंडळ कार्यालयावर भव्य स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या संदर्भात लवकरच औपचारिक निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





