best news portal development company in india

समृद्धी महामार्गावर नववर्षाच्या सुरुवातीलाच काळजाचा थरकाप; केमिकल टँकरचा भीषण अपघात, दोघांचा होरपळून मृत्यू…

SHARE:


सिन्नर,२ जानेवारी २०२६

विशेष प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
    सिन्नर:नवीन वर्षाचे स्वागत होत असतानाच समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरने भंगाराच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने लागलेल्या भीषण आगीत टँकरमधील दोघांचा जागीच जिवंत जळाल्याने (होरपळून) मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (१ जानेवारी) मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास घडला.
  मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीकडून नागपूरच्या दिशेने भंगार घेऊन जाणारा एक ट्रक (चालक: सुरेंद्र यादव) समृद्धी महामार्गावरून जात होता. यावेळी पाठीमागून येणाऱ्या केमिकल टँकरने या ट्रकला दोनदा जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की टँकर महामार्गावरच उलटला आणि काही क्षणांतच त्याने पेट घेतला. टँकरमधील केमिकलमुळे आगीने रौद्र रूप धारण केले, ज्यामुळे टँकरमधील चालक आणि क्लीनरला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.


  या अग्नितांडवात मृत्यू झालेले दोन्ही तरुण मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.अंतिम लाल रावत (चालक)
कृष्णा मोहन यादव (क्लीनर) असी मृतांचे नाव आहे.
या दोघांनीही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीच्या वेढ्यामुळे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि त्यांचा करुण अंत झाला.
अपघातानंतर भंगाराच्या ट्रकचा चालक सुरेंद्र यादव हे बेशुद्ध पडले होते. मात्र, महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी तत्परता दाखवत ट्रकच्या काचा फोडून यादव यांना बाहेर काढले. त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारून त्यांना शुद्धीवर आणले. शुद्धीवर आल्यानंतर आपल्या डोळ्यांदेखत टँकर जळताना पाहून यादव यांना मोठा धक्का बसला.


या टँकरमध्ये हायड्रोजन नायट्रोजन सारखी घातक रसायने होती. सुदैवाने, टँकरला आग लागली असली तरी केमिकलचा मोठा स्फोट झाला नाही. तसेच, ही घटना गोंदे शिवारातील एका निर्जन स्थळी घडल्याने आजूबाजूला लोकवस्ती नव्हती, ज्यामुळे मोठा अनर्थ टाळला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आटोकाट प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत टँकरमधील दोघांचा मृत्यू झाला होता. सिन्नर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई