best news portal development company in india

नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; निवडणुका आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर १९८ जणांना नाशिक शहरातून तडीपार!

SHARE:

प्रतिनिधी नाशिक


नाशिक: नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका आणि मकर संक्रांतीचा सण शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी नाशिक पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिमंडळ १ अंतर्गत तब्बल १९८ संशयितांना १५ दिवसांसाठी नाशिक शहरातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.https://youtu.be/BVNmDMeiTTc?si=cdVzkv9GJI4W81I5
    नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ अन्वये ही प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये दोन प्रमुख गटांतील लोकांचा समावेश आहे:
१. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले इसम: पोलीस रेकॉर्डवरील अशा ११५ सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे, ज्यांच्यामुळे निवडणुकांच्या काळात शांतता भंग होण्याची शक्यता होती.
२. नायलॉन मांजा विक्रेते व साठेबाज: मकर संक्रांतीच्या काळात बंदी असलेल्या घातक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या किंवा तो बाळगणाऱ्या ७३ जणांनाही शहराबाहेर काढण्यात आले आहे.
कोणत्या पोलीस स्टेशन अंतर्गत किती तडीपार?
या कारवाईत परिमंडळ १ मधील विविध पोलीस ठाण्यांनी दिलेल्या प्रस्तावांच्या आधारे खालीलप्रमाणे तडीपारीचे आदेश देण्यात आले आहेत.

या मध्ये भद्रकाली पोलीस ठाणे: ३९ जण पंचवटी पोलीस ठाणे: ३० जण आडगाव पोलीस ठाणे: २९ जण मुंबई नाका पोलीस ठाणे: २९ जण म्हसरूळ पोलीस ठाणे: २८ जण सरकारवाडा पोलीस ठाणे: २७ जण गंगापूर पोलीस ठाणे: १६ जण असे हे सर्व १९८ इसम २ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत नाशिक शहराच्या हद्दीत प्रवेश करू शकणार नाहीत. या काळात त्यांनी शहरात आढळल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
    या कारवाईबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्तांनी सांगितले की, “निवडणुका निर्भय वातावरणात पार पडाव्यात आणि मकर संक्रांतीचा सण सुरक्षितपणे साजरा व्हावा यासाठी हा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. सर्व नाशिककरांनी कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता आपल्या मतदानाचा हक्क बजावावा.”

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई