प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

सिन्नर:या प्रदर्शनात आधुनिक कृषी अवजारे, ट्रॅक्टर व यंत्रसामग्री, सिंचन तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते, सेंद्रिय शेती उपाय, तसेच दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन यासंदर्भातील अद्ययावत माहिती व प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत. यासोबतच कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, प्रात्यक्षिके आणि थेट उत्पादक–ग्राहक संवादाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, बदलत्या काळात शेती व पशुपालनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अत्यावश्यक आहे.
अशा प्रदर्शनांमुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्याचे मार्ग आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी मिळतात. त्यामुळे शेतकरी, तरुण उद्योजक, महिला बचत गट व कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही त्यांनी नमूद केले.सिन्नर परिसरासह नाशिक जिल्हा व राज्यभरातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीने हे प्रदर्शन कृषी क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

“एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





