प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी

कोपरगाव:वर्तमान हंगामात पुरेसा पाऊस झाल्यामुळे रब्बी पिके जोमदार स्थितीत असली, तरी पिकांच्या योग्य वाढीसाठी अत्यावश्यक असणारे युरिया खत वेळेत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यात युरियाचा तातडीने व नियमित पुरवठा सुनिश्चित करावा, अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना पाठवलेल्या पत्राद्वारे दिल्या आहेत.

सध्या कोपरगाव तालुक्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा जाणवत असून, हा तुटवडा नैसर्गिक आहे की कृत्रिमरीत्या निर्माण केला जात आहे, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. कृषी विभागाच्या ऑनलाईन ब्लॉक प्रणालीवर मोठ्या प्रमाणात बफर स्टॉक उपलब्ध असल्याची नोंद असतानाही, प्रत्यक्ष कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने मोठी हेळसांड सुरू आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

आमदार आशुतोष काळे यांनी पत्रात नमूद केले आहे की, रब्बी हंगाम सुरू असताना तालुक्यातील सेवा सहकारी संस्था व कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यंदा रब्बी पिकांसाठी वातावरण अतिशय पोषक असून ऊस, गहू, मका, कांदा ही पिके चांगल्या अवस्थेत आहेत. मात्र, युरिया खत वेळेवर न मिळाल्यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
बदलत्या हवामानाला तोंड देत शेतकरी शेती व्यवसाय करीत असताना, ऐन रब्बी हंगामात युरिया टंचाईमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे तालुका-निहाय मागणीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त साठा उपलब्ध करून घ्यावा, तसेच शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असेही आमदार काळे यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कोपरगाव तालुक्यात युरिया खताचा नियमित व सुरळीत पुरवठा तातडीने सुरू करावा, अशा ठोस सूचनाही आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दिल्या असून, याबाबतचे पत्र त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

“एवन न्यूज महाराष्ट्र”
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





